प्रश्न :-
भोगवटादार-२ प्रकारच्या जमिनी म्हणजे काय?उत्तर :-
भोगवटादार वर्ग २ ची व्याख्या 'महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६, कलम कलम २९(३) मध्ये नमूद आहे. ज्या शेतजमिनीचा मालक शेतकरी स्वत: नसतो, ज्या जमिनीचे हस्तांतरण करण्याच्या हक्कावर शासनाचे निर्बंध असतात तसेच ज्या जमिनीची विक्री करण्यासाठी त्या शेतकर्यावर काही बंधने/अटी असतात आणि त्यासाठी सक्षम अधिकार्याच्या परवानगी आणि काही शासकीय सोपस्कार पूर्ण करण्याची आवश्यकता असते.
अशा शेत जमिनीला भोगवटादार २ च्या अथवा दुमाला किंवा नियंत्रीत सत्ता प्रकारची, शर्तीची जमीन असे म्हणतात.
भोगवटादार २ ची नोंद गाव नमुना क्रमांक एक-क मध्येही केली जाते.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in