महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम
1966 काही ठळक महत्वाच्या कलमांचा संक्षिप्त परिचय
खाली नमूद केलेल्या कलमांचे वाचन गरजे प्रमाणे वेळो वेळी
करावे.
कलम 3 राज्याची महसुली क्षेत्रांमध्ये
विभागणी
कलम 4 महसुली क्षेत्रांची रचना
कलम 13 महसूल अधिकाèयांचे अधिकार व कर्तव्ये
कलम 14 भूमापन अधिकारी,मंडल अधिकारी इत्यादिंचे अधिकार व कर्तव्ये.
कलम 20 इतरांची मालमत्ता नसलेल्या सर्व
जमिनी, सार्वजनिक रस्ता, गल्ली किंवा
मार्ग यातील किंवा यावरील लोकांचे हक्क
नाहीसे होणे.
कलम 23 कुरणाच्या वापराचे नियमन
कलम 25 धारण जमिनीतील झाडांवरील हक्क
कलम 28 लाकडे तोडण्याचे व त्यांच्या
पुरवठ्याचे नियमन वगैरे
कलम 29 जमीन धारण करणाऱ्या व्यक्तींचे
वर्ग
कलम 32 शासनाकडे निहीत असलेली जलोढ (मळई)
जमीन देणे.
कलम 34 मृत्युपत्र रहीत वहिवाटीचा
विनियोग
कलम 36 विविक्षित निर्बंधास अधीन राहून
वहिवाट हस्तांतरणीय व वंशपरंपरागत असणे कलम 36 अ जमातीतील
(आदिवासी) व्यक्तींकडून करण्यात येणाऱ्या वहिवाटीच्या हस्तांतरणावर निर्बंध. कलम 38 पट्टे देण्याचा अधिकार
जमिनीचा उपयोग आणि जमिनीचा अकृषिक (शेती व्यतिरिक्त)
कारणासाठी-उपयोगासाठी परवानगी याबाबत कलम 41 ते 45 मधे मार्गदर्शन केले आहे.
कलम 48 खाणी व खनिजे यावरील शासनाचा हक्क
कलम 49 इतर व्यक्तींच्या मालकीच्या
जमिनीतून पाण्याचे पाट बांधणे
कलम 50 शासनाकडे निहीत असलेल्या
जमिनीवरील अतिक्रमण दूर करणे
कलम 51 अतिक्रमण नियमात बसविणे
कलम 59 अनधिकृत जमिनीचा भोगवटा करणाऱ्या
व्यक्तीस संक्षिप्तरीत्या चौकशी करून काढून टाकणे. कलम 70 पाण्याच्या
वापरासंबंधीचे दर
कलम 72 जमीन महसूल हा जमिनीवरील
सर्वश्रेष्ठ भार असेल
कलम 75 दुमाला जमिनींची नोंदवही
कलम 82 भू-मापन क्रमांक हे विशिष्ट
व्याप्तीपेक्षा कमी असणार नाहीत.
कलम 84 भू-मापन क्रमांक व उपविभाग यांची
अभिलेखात नोंद
कलम 85 विभाजन
कलम 86 भू-मापन क्रमांकाची नवीन भू-मापन
क्रमांकामध्ये विभागणी
कलम 87 भू-मापन क्रमांकाची उपविभागात
विभागणी
कलम 134 शेताच्या हद्दी ठरविणे
कलम 138 हद्दी ठरविल्याचा परिणाम-शेजाऱ्याने
जमिनीवर अतिक्रमण केल्यास या कलमाचा उपयोग होतो. कलम 143
हद्दीवरून रस्त्याचा अधिकार
कलम 148 अधिकाराभिलेख
कलम 149 अधिकार संपादन केल्याचे
प्रतिवृत्त देणे
कलम 150 फेरफार नोंदवही व वादात्मक
प्रकरणांची नोंदवही
कलम 151 माहिती पुरविण्याचे बंधन,
जमीन धारकास किंवा कुळास अधिकाराभिलेखातील नोंदी पुस्तिकेच्या रूपाने पुरविण्याचे बंधन आणि पुस्तिका वगैरे
ठेवणे.
कलम 154 नोंदणी करणाऱ्या अधिकाèयांनी हस्तांतरणाबाबत माहिती कळविणे
कलम 155 लेखन प्रमादांची दुरूस्ती
कलम 157 अधिकाराभिलेख व फेरफार नोंदवही
यामधील नोंदी बरोबर असल्याचे गृहीत धरणे कलम 161
निस्तारपत्रक - गावाच्या हद्दीत भोगवट्यात नसलेल्या सर्व जमिनीच्या उपयोगाबाबत
त्यावरील नैसर्गिक संपत्तीच्या उपयोगाबाबत
व्यवस्थेसंबधीची योजना अंतर्भूत असलेले एक निस्तार पत्र जिल्हाधिकारी तयार करतील.
कलम 165 गावाच्या हद्दीतील जमीन व पाणी
यांच्या व्यवस्थे संबंधीच्या हक्कांची नोंद करणाऱ्या अभिलेखास वाजीब-उल-अर्ज संबोधण्यात येते.
कलम 166 मच्छिमारी इत्यादींचे नियमन
(शासकीय तलावातील मच्छिमारी)
कलम 242 बेकायदेशीररीत्या जमीन कब्जात
ठेवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस निष्कासित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याने अशी कार्यवाही करावी.
कलम 247 अपील व अपील अधिकारी
कलम 249 पुनर्विलोकन किंवा पुनरीक्षण या
विरूद्ध अपील
कलम 257 राज्यशासन व विवक्षित महसूल आणि
भूमापन अधिकारी यांचा त्यांच्या हाताखालील अधिकाèयांचे
अभिलेख व कार्यवाही मागविण्याचा व त्यांची तपासणी करण्याचा अधिकार
कलम 258 आदेशांचे पुनर्विलोकन
कलम 327 नकाशे आणि जमिनी संबंधीचे अभिलेख तपासणी इत्यादींसाठी खुले असणे त्या संबंधीचे नियम कलम 328 मधे आहेत.