प्रश्न :-
सात-बारा वरील आणेवारी म्हणजे काय?उत्तर :-
सात-बारा उतार्यावर, प्रत्येक सहधारकाचे धारण क्षेत्र 'आणे-पै' या पध्दतीने दर्शविणे म्हणजे आणेवारी. जमिनीच्या सात-बारा उतार्यावर 'आणेवारी' दाखल करण्याची पध्दत ब्रिटीश काळात अँडरसनच्या कारकिर्दीत रुढ झाली असे म्हटले जाते. प्राचीन अर्थक्षेत्रातील व्यवहारात प्रचलीत 'आणे-पै' पध्दतीचा यावर प्रभाव आहे. महसूल खात्यात प्रचलीत या पध्दतीनुसार एक आणा म्हणजे बारा पैसे; सोळा आणे म्हणजे एक रुपया; १९२ पैसे म्हणजे १६ आणे; म्हणजेच एक रुपया. 'आणे' ‘ या चिन्हाने (एक उलटा स्वलपविराम) दर्शविले जातात आणि 'पै' ‘‘ या चिन्हाने (दोन उलटे स्वलपविराम) दर्शविले जातात.
* 'आणेवारी' काढण्याचे सुत्र:
जमिनीचे एकुण क्षेत्रफळ x दर्शविलेली आणेवारी (आण्याचे पै मध्ये रुपांतरण करून पै. मध्ये) ÷ १९२ या सुत्राने क्षेत्र काढले जाते. आणे-पैसे पध्दतीनुसार जमिनीचे क्षेत्र कितीही असले तरी ते १९२ पैसे म्हणजे १६ आणे म्हणजेच एक रुपया मानले जाते.
*आणेवारी चिन्हांची उदाहरणे:
F ‘ ४ = चार आणे; F ‘ १२ = बारा आणे; F ‘ २ ‘ ६ = दोन आणे सहा पै. [चिन्ह, त्यानंतर अंक, पुन्हा चिन्ह आणि पुन्हा अंक असे लिहिले असेल तर पहिले चिन्ह आणे आणि नंतरचे चिन्ह पै दर्शविते.] F ‘‘ ४ = चार पै.
* आणेवारी नुसार सात-बारा वरील खातेदाराचे क्षेत्र काढतांना खालील सूत्र वापरण्यात येते.
जमिनीचे एकुण क्षेत्रफळ x खातेदाराची दर्शविलेली आणेवारी (आण्याचे पै मध्ये रुपांतरण करून पै. मध्ये) ÷ १९२ उदा. पाच आणे चार पै आणेवारीचे क्षेत्र काढायचे असल्यास पाचला १२ (एक आणाचे पै रुपांतर) ने गुणावे म्हणजे पाच आण्याचे पै मध्ये रुपातर मिळेल. नंतर यात पाच आणे चार पै आणेवारीतील उर्वरीत चार पै. मिळवावेत. ५ x १२ = ६० + ४ = ६४ पै. वरील सुत्रानूसार येथे जमिनीचे एकुण क्षेत्रफळ x ६४ ÷ १९२ असे गणित येईल. याचे उत्तर म्हणजे पाच आणे चार पै क्षेत्र.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in