भोगवटादार-१ प्रकारच्‍या जमिनी म्‍हणजे काय?

प्रश्‍न :-

भोगवटादार-१ प्रकारच्‍या जमिनी म्‍हणजे काय?

उत्तर :-

भोगवटादार वर्ग १ ची व्‍याख्‍या 'महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६, कलम २९(२) मध्‍ये नमूद आहे.

ज्‍या शेतजमिनीचा मालक शेतकरी स्‍वत: असतो अशा जमिनीस भोगवटादार-१ ची जमीन म्‍हणतात.

अशा जमिनीची विक्री करण्‍यासाठी त्‍या शेतकर्‍यावर कोणतेही बंधन नसते किंवा कोणाच्‍याही परवानगीची आवश्‍यकता नसते.

अशा शेतजमिनीला बिनदुमाला किंवा खालसा जमीनही म्‍हणतात.

Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

About the author

Mahsul Guru
Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment