प्रश्न :-
सात-बारा नुसार क्षेत्राचा आकार कसा काढावा?उत्तर :-
अनेकदा खरेदी क्षेत्राची नोंद करतांना, म.ज.म.अ. कलम ८५ अन्वयेच्या आदेशाचा अंमल देतांना अथवा न्यायालयीन आदेशान्वये शेत जमीनीच्या सहधारकांमध्ये झालेल्या वाटपाची नोंद घेतांना संबंधित व्यक्तीपुरता आकार वेगळा दर्शविणे व सदर आकाराची नोंद गाव नमुना आठ-अ ला नोंदविणे यात अडचणी येतात.
प्रत्येक सात-बारा सदरी एकूण आकार नमुद असतो. सदर आकार, आकारबंधानूसार ठरलेला असतो. या आकारात बदल करण्याचा अधिकार तलाठी यांना नसतो तथापि, जर एखाद्या खातेदाराचे क्षेत्र अन्य खातेदारांमध्ये विभागले गेल्यास हा आकार सर्व खातेदार निहाय वेगळा करावा लागतो. असा आकार खालील सुत्रानुसार काढावा.
सात-बारा वरील एकुण आकार भागिले सात-बाराचे एकुण क्षेत्र गुणिले ज्या क्षेत्राचा आकार काढायचा आहे ते क्षेत्र
उदाहरण : रामभाऊ, गणपत आणि मारुती या तिघांच्या नावावर गट नं. १९२ आहे ज्याचे एकुण क्षेत्र ७ हे. २० आर आणि एकुण आकार रु.१२.३५ आहे. रामभाऊच्या नावे ३ हे. ८० आर क्षेत्र आहे, गणपतच्या नावे १ हे.५३ आर आणि मारुतीच्या नावे १ हे. ८७ आर क्षेत्र आहे.
अशावेळेस प्रथम रामभाऊच्या नावे असणार्या ३ हे. ८० आर क्षेत्राचा आकार वरील सुत्रानूसार काढावा.
F ७/१२ चा एकुण आकार रु. १२.३५ भागिले ७/१२ चे एकुण क्षेत्र ७ हे. २० आर गुणिले रामभाऊच्या नावे असणारे क्षेत्र ३ हे. ८० आर = आकार रु. ६.५१ F आता गणपतच्या नावे असणार्या १ हे. ५३ आर क्षेत्राचा आकार वरील सुत्रानुसार काढावा.
७/१२ चा एकुण आकार रु. १२.३५ भागिले ७/१२ चे एकुण क्षेत्र ७ हे. २० आर गुणिले गणपतच्या नावे असणारे क्षेत्र १ हे. ५३ आर = आकार रु. २.६२ F आता मारुतीच्या नावे असणार्या १ हे. ८७ आर क्षेत्राचा आकार वरील सुत्रानुसार काढावा.
७/१२ चा एकुण आकार रु. १२.३५ भागिले ७/१२ चे एकुण क्षेत्र ७ हे. २० आर गुणिले मारुतीच्या नावे असणारे क्षेत्र १ हे. ८७ आर = आकार रु. ३.२० म्हणजेच रामभाऊच्या नावे असणार्या ३ हे. ८० आर क्षेत्राचा आकार रु. ६.५१; गणपतच्या नावे असणार्या १ हे. ५३ आर क्षेत्राचा आकार रु. २.६२ आणि मारुतीच्या नावे असणार्या १ हे. ८७ आर क्षेत्राचा आकार रु. ३.२० सात-बारा वरील एकुण आकार रु. १२.३३ (पुर्णांकात रु. १२.३५) (सात-बारा वरील क्षेत्र जर आणे-पै. मध्ये दर्शविले असेल तर त्याचे रुपांतर हे. आर मध्ये करुन घ्यावे.)
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in