प्रश्न :-
गावात प्रथमच गाव नमुना आठ-अ तयार करतांना खातेदारांच्या नावाची निश्चिती कशी केली जाते?उत्तर :-
प्रथम जमीन महसुलाचे प्रदान करण्यास जबाबदार असणार्या व्यक्तींची नावे, गाव नमुना सात मधुन निश्चित केली जातात.
अशा व्यक्तींची नावे कागदाच्या चिठ्यांवर लिहून नंतर त्यांना मराठी अक्षरांच्या वर्णानूक्रमे लावून स्वाभाविक क्रमानुसार अनुक्रमांक दिले जातात. हा अनुक्रमांक जमीन महसुलाचे प्रदान करण्यास जबाबदार असणार्या व्यक्तीचा आठ-अ मधील खाते क्रमांक बनतो. अशा रितीने सर्व खाती उघडल्यानंतर गावात काही 'मक्ता खाती' शिल्लक रहातात. त्यांची नोंद गाव नमुना आठ-ब मध्ये केली जाते. (मक्ता खाते: ज्या व्यक्ती जमीन धारण करीत नसल्यामुळे त्यांना गाव नमुना आठ-अ मध्ये कोणतेही खाते देण्यात आलेले नाही.)
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in