भूमापन क्रमांक व हिस्‍सा क्रमांक लिहिण्‍याची योग्‍य पध्‍दत काय आहे?

प्रश्‍न :-

भूमापन क्रमांक व हिस्‍सा क्रमांक लिहिण्‍याची योग्‍य पध्‍दत काय आहे?

उत्तर :-

प्रचलित पध्‍दतीनुसार विविध प्रकारे भूमापन क्रमांक व हिस्‍सा क्रमांक लिहिला जातो. उदा. ५अ/१/ब किंवा ४/१+२+३/२ इत्‍यादी. मोजणी खात्‍यामार्फत उपविभाग पाडतांना पूर्वेकडून पश्‍चिमेकडे आणि घडाळ्‍याच्‍या काट्‍याच्‍या दिशेप्रमाणे उपविभाग पाडले जातात.

त्‍यानुसार प्रथम उपविभागास १,२,३ असे तर व्‍दितीय उपविभागास अ,ब,क असे संबोधण्‍यात येते. त्‍यामुळे भूमापन क्रमांक व हिस्‍सा क्रमांक अल्‍फा न्‍युमरिकल पध्‍दतीने, उदा. ४/१/अ/२ याप्रकारे लिहिणे आवश्‍यक आहे.

Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

About the author

Mahsul Guru
Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment