प्रश्न :-
प्रतिबंधित झाडे तोडण्यासाठी परवानगी कोणाकडून आणि कोणत्या परिस्थितीत देण्यात येते?उत्तर :-
प्रतिबंधित झाडे तोडण्यासाठी वन विभागातील वन अधिकार्याकडून परवानगी दिली जाते. अपवादात्मक परिस्थितीत उपविभागीय अधिकारी अशी परवानगी, वन अधिकार्याशी चर्चा करून देऊ शकतात.
खालील परिस्थितीत त्यांचेकडून झाडे तोडण्यास परवानगी दिली जाते.
- (अ) झाड वाळून मृत झाले असल्यास,
- (ब) झाडावर रोग पडून किंवा वार्यामुळे झाड वाकून मोडले असल्यास,
- (क) वनीकरणाच्या दृष्टीने झाड पक्व झाले असल्यास,
- (ड) झाडामुळे वाहतूकीस अडचण येत असल्यास,
- (इ) आग, पाऊस किंवा नैसर्गिक कारणांमुळे झाडापासून फार मोठी इजा होण्याचा संभव असल्यास,
- (फ) झाडांचा वसवा झाल्यामुळे शेती करणे अशक्य झाल्यास,
- (फ) झाडामुळे जीवीतास नुकसान पोहोचण्याची शक्यता असेल तर,
- (र) झाडामुळे पाणी दूषित होण्याची शक्यता असेल तर,
- (ल) झाड वठलेली असेल तर,
- (व) झाडाच्या सावलीमुळे पिकांच्या उत्पन्नावर विपरित परिणाम होत असेल तर अशी परवानगी दिली जाते.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in