प्रतिबंधित झाडे तोडण्यासाठी परवानगी कोणाकडून आणि कोणत्‍या परिस्‍थितीत देण्‍यात येते?

प्रश्‍न :-

प्रतिबंधित झाडे तोडण्यासाठी परवानगी कोणाकडून आणि कोणत्‍या परिस्‍थितीत देण्‍यात येते?

उत्तर :-

प्रतिबंधित झाडे तोडण्यासाठी वन विभागातील वन अधिकार्‍याकडून परवानगी दिली जाते. अपवादात्‍मक परिस्‍थितीत उपविभागीय अधिकारी अशी परवानगी, वन अधिकार्‍याशी चर्चा करून देऊ शकतात.

खालील परिस्थितीत त्‍यांचेकडून झाडे तोडण्यास परवानगी दिली जाते.

  1. (अ) झाड वाळून मृत झाले असल्यास,
  2. (ब) झाडावर रोग पडून किंवा वार्‍यामुळे झाड वाकून मोडले असल्यास,
  3. (क) वनीकरणाच्या दृष्‍टीने झाड पक्व झाले असल्यास,
  4. (ड) झाडामुळे वाहतूकीस अडचण येत असल्यास,
  5. (इ) आग, पाऊस किंवा नैसर्गिक कारणांमुळे झाडापासून फार मोठी इजा होण्याचा संभव असल्यास,
  6. (फ) झाडांचा वसवा झाल्यामुळे शेती करणे अशक्य झाल्यास,
  7. (फ) झाडामुळे जीवीतास नुकसान पोहोचण्याची शक्यता असेल तर,
  8. (र) झाडामुळे पाणी दूषित होण्याची शक्यता असेल तर,
  9. (ल) झाड वठलेली असेल तर,
  10. (व) झाडाच्या सावलीमुळे पिकांच्या उत्पन्नावर विपरित परिणाम होत असेल तर अशी परवानगी दिली जाते.

Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

إرسال تعليق