प्रश्न :-
नैसर्गिक आपत्तीमध्ये तलाठी आणि मंडल अधिकारी यांची भूमिका काय असते?उत्तर :-
गाव पातळीवर शासनाचे प्रतिनिधी या नात्याने तलाठी आणि मंडल अधिकारी कार्यरत असतात. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यांनी खालील कृती तात्काळ करावी.
- तलाठी यांनी त्यांच्या गाव/सज्यांतील सर्व स्वातंत्र्य सैनिक, महत्वाच्या आणि अति महत्वाच्या व्यक्ती, मोठे व्यापारी, डॉक्टर, शाळांतील शिक्षक, सर्व कोतवाल, पोलीस पाटील, सर्प मित्र, पट्टीचे पोहणारे, बोटी, सेवानिवृत्त शासकीय अधिकारी/कर्मचारी, शासकीय यंत्रणेला मदत करणारे स्वयंसेवक, वाहतूक व्यापारी, सार्वजनिक मंडळे, क्लब, ट्रस्ट, हॉटेल/लॉजिंग, देऊळ, इत्यादींची संपूर्ण माहिती असणारे रजिस्टर आधीच तयार करुन ठेवावे. आपत्कालीन परिस्थितीत यांचा चांगला उपयोग होऊ शकतो.
- तात्काळ घटनास्थळी भेट द्यावी आणि शक्य तितकी मदत करावी.
- शक्य असेल तितक्या लवकर वरिष्ठांना नैसर्गिक आपत्तीच्या गांभिर्याची कल्पना आणि नुकसानीचा अंदाज द्यावा.
- घटनास्थळाचा पंचनामा करावा आणि संबंधितांचे जाब जबाब घ्यावे.
- बाधित व्यक्तींना शासकीय स्तरावर मदत मिळण्यास वेळ लागण्याची संभावना असते. ती लक्षात घेऊन तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी स्थानिक स्तरावर अत्यावश्यक मदत उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न करावेत.
- बाधित व्यक्तींना सुरक्षित स्थानावर हलविण्याची व्यवस्था करावी.
- बाधित व्यक्तींच्या जेवणाची व्यवस्था करावी.
- बाधित व्यक्तींना शासनाकडून प्राप्त होणारी आर्थिक व अन्य मदत करतांना मानवतावादी दृष्टिकोन ठेवावा.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in