प्रश्न :-
जमीनीची कमाल धारणा मर्यादा काय आहे?उत्तर :-
महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम १९६१ अन्वये:
- (अ) कोरडवाहू (जिरायत जमीन): ५४ एकर;
- (ब) हंगामी पाटपाण्याखालील बागायत जमीन: ३६ एकर;
- (क) बारमाही पाणीपुरवठ्याखालील व कमीत कमी एका पिकासाठी खात्रीने पाणी मिळणारी बागायत जमीन: २७ एकर;
- (ड) कायम बागायत वर्षात दोन पिकासाठी खात्रीने पाणी मिळणारी बागायत जमीन: १८ एकर.
एकाच कुटुंबाकडे वरील चार प्रकारची संमिश्र जमीन असल्यास, त्यांचे क्षेत्र उपरोक्त कायद्यान्वये कमी किंवा जास्त आहे हे ठरविण्यासाठी सर्वच क्षेत्राचे जिरायत क्षेत्र ठरवून एकूण क्षेत्र किती होते ते खालील प्रमाणे पहावे.
- १ एकर- कायम बागायत = ३ एकर
- १ एकर- वषार्तून एक पिक बागायत असणारे क्षेत्र = २ एकर
- १ एकर- हंगामी बागायत = दिड एकर
- १ एकर- भात शेती = दिड एकर
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in