प्रश्न :-
एखाद्या व्यक्तीने नोटीस ऑफ लिस पेन्डन्स विरूध्द हरकत अर्ज दाखल केल्यास काय करावे?उत्तर :-
नोटीस ऑफ लिस पेन्डन्समुळे कोणत्याही हक्काचे हस्तांतरण होत नाही तथापि, संबंधित जमिनीबाबत न्यायालयात दावा दाखल आहे याची माहिती तमाम जनतेला व्हावी या हेतूने अशी नोंद, दावा दाखल करणार्यांचे नावाचा उल्लेख न करता इतर हक्कात केली जाते आणि दाव्याचा निकाल झाल्यानंतर पुरावा बघून कमी केली जाते.
जमिनीबाबत व्यवहार करतांना लोकांनी सावध असावे आणि वाद न्यायप्रविष्ट असतांना जमिनीचे हस्तांतरण होऊन कायदेशीर गुंतागुंत वाढू नये हा या नोंदींचा उद्देश असतो. असे नमूद करून हरकत अर्ज फेटाळता येतो.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in