उत्तर:
कोणतीही नोटीस बजावली जाणे महत्वाचे असते. नोंदणीकृत पोहोच-देय डाकेने पाठविलेल्या
नोटीसीची पोहोच परत आल्यास नोटीस बजावली गेली असे गृहित धरले जाते.
एखादी व्यक्ती नोटीस घेण्यास
किंवा नोटीस बुकावर स्वाक्षरी करण्यासाठी हजर राहण्यास टाळाटाळ करीत असल्याचे
लक्षात आल्यास, संबंधीत इसमाच्या शेवटच्या
ज्ञात पत्त्यावर, त्याच्या घरातील सज्ञान व्यक्तीकडे
देऊन व त्याची पोहोच घेऊन नोटीस बजावता येते अथवा पंचनाम्याने, घराच्या मुख्य दरवाज्याला किंवा जमिनीला डकवून
(चिकटवून) बजावली जाते. अशाप्रकारे पंचनाम्याने डकवलेली नोटीस बजावली गेली असे
गृहीत धरले जाते. काही प्रकरणात वर्तमानपत्रात प्रसिध्द करून नोटीस बजावता येते.