उत्तर:
नाही, नोंदणीकृत दस्त हा मूळ आणि कायम
पुरावा आहे त्यामुळे त्यात काही चूक असल्यास चूक दुरुस्तीचा दस्त करणेच आवश्यक
आहे. तलाठी स्तरावर अशी चूक दुरूस्त करणे बेकायदेशीर आहे. नोंदणी कायदा कलम ८१ अन्वये
नोंदणी कायद्यान्वये सादर केलेल्या किंवा निक्षेपित केलेल्या कोणत्याही दस्तऐवजाचे
पृष्ठांकन, अनुवाद किंवा नोंदणी मुद्दाम
अशुध्द केल्यास तो भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा ठरतो.
नोंदणीकृत दस्तातील एखादा
लेखन-प्रमाद, नोंदीबाबत निर्णय घेतांना
प्रमाणन अधिकार्याच्या निदर्शनास आल्यास चूक दुरूस्तीचा दस्त करण्याबाबत शेरा
लिहून ती नोंद रद्द करावी.