Close

गाळपेर जमीन म्हणजे काय?

 

उत्तर: महाराष्ट्र जमिन महसूल (सरकारी जमिनीची विल्‍हेवाट लावणे) नियम १९७१, नियम २(ओ)(एक) अन्‍वये गाळपेर जमीन ची व्‍याख्‍या दिलेली आहे. नदी, नाले, तलाव, सरोवर, जलाशय, बांध, जलमार्ग किंवा सर्व स्‍थिर आणि प्रवाही पाण्‍याच्‍या तळाशी स्‍थित असलेली जमीन, नैसर्गिक प्रक्रियेमध्‍ये पाणी कमी झाल्‍यामुळे दिसू लागते आणि सामान्‍यत: कृषीसाठी उपलब्‍ध होते अशी जमीन म्‍हणजे गाळपेर जमीन. तथापि, गाळपेर जमिनीचा समावेश, म.ज.म.अ. कलम ३२ व ३३ अन्‍वये नमुद मळई/जलोढ जमिनीमध्‍ये होत नाही.

Comments

Content