Close

वरकस जमीन, जिरायत जमीन आणि बागायत जमीन म्‍हणजे काय?

 

उत्तर: वरकस जमीन म्‍हणजे भात शेती लागवडीसाठी, राबखताच्या प्रयोजनार्थ उपयोगात आणली जाणारी जमीन. वरकस जमिनीची व्‍याख्‍या कुळकायदा कलम २०-अ मध्‍ये नमुद आहे. तुकडेबंदी-तुकडेजोड व एकत्रीकरण कायदा, १९४७ अन्‍वये वरकस जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र २० गुंठे ठरविले आहे. तर कोरडवाहू किंवा जिरायत जमीन म्‍हणजे पावसाच्या पाण्यावर शेती होत असणारी जमीन. तुकडेबंदी-तुकडेजोड व एकत्रीकरण कायदा, १९४७ अन्‍वये कोरडवाहू किंवा जिरायत जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र १५ गुंठे ठरविले आहे., आणि बागायत जमीन म्‍हणजे कॅनॉल, मोट, पाट याने शेतीसाठी पाणीपुरवठा होत असणारी जमीन. तुकडेबंदी-तुकडेजोड व एकत्रीकरण कायदा, १९४७ अन्‍वये विहिर बागायती बागायती जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र २० गुंठे तर कॅनॉल (पाट) बागायती जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र १० गुंठे ठरविले आहे.

नारळ, पोफळी झाडे लावण्‍यासाठी वापरण्‍यात येणार्‍या वाडी जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र ०५ गुंठे आहे.

Comments

Content