Close

एखाद्‍या खातेदाराने स्वत:च्या हिस्‍स्‍याच्‍या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राची विक्री केल्‍यास नोंदीवर काय निर्णय घ्‍यावा?

 

उत्तर: मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२, कलम ५४ अन्वये 'विक्री' ची व्‍याख्‍या दिलेली आहे. त्‍यातील खुलास्‍यानुसार विक्रेता हा फक्‍त स्‍वत:च्‍या मालकी हक्‍काच्‍या वस्‍तूंचीच विक्री करू शकतो हे स्‍पष्‍ट होते. अशा प्रकारच्‍या व्‍यवहाराची नोंद रद्‍द केल्‍यास, खरेदी घेणार याच्‍यावर अन्‍याय केल्‍यासारखे होते शिवाय कायदेशीरपणे नोंदणीकृत असलेल्‍या दस्‍ताची नोंद करणे आवश्‍यक आहे.

एखाद्या इसमाने स्वत:च्या मालकीच्‍या हिस्‍स्‍याच्‍या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राची विक्री केली असली तरी

खरेदी देणार यांच्या मालकीच्या/हक्काच्या क्षेत्रापुरतीच नोंद प्रमाणीत करावी.

Comments

Content