Close

प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदीच्‍या नोंदीबाबत काय निर्णय घ्‍यावा?

 

उत्तर: शेतजमिनीच्‍या छोट्‍या तुकड्‍यात शेतीचे काम करणे अवघड जाते, व तुलनेने उत्‍पादन फारच कमी मिळते. त्‍यामुळे सन १९४७ मध्‍ये शासनाने तुकडेबंदी-तुकडेजोड व एकत्रीकरण कायदा, १९४७ अंमलात आणला आणि त्‍याच्‍या कलम ८ अन्‍वये सर्व प्रकारच्‍या जमिनींचे प्रमाणभूत क्षेत्र ठरवून दिले. या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन कोणालाही खरेदी करता येत नाही. 

तथापि, प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदीची नोंद असल्‍यास ती नोंद तुकडेबंदी-तुकडेजोड व एकत्रीकरण कायद्‍याविरूध्‍द व्‍यवहार असल्‍याने रद्‍दच करावी लागते. तरीही झालेला खरेदी दस्‍त नोंदणीकृत असल्‍याने तसेच सदर क्षेत्राची विक्री परत दुसर्‍याला करण्‍यात येऊ नये यासाठी सदर व्यवहाराचा शेरा ‘इतर हक्कात’ ठेवावा असे माझे मत आहे.

Comments

Content