प्रश्न :-
नोंदीवर निर्णय होण्यापूर्वीच खरेदी देणार किंवा खरेदी घेणार मयत झाला असेल तर अशा नोंदीवर काय निर्णय घ्यावा?उत्तर :-
खरेदी देणार आणि खरेदी घेणार यांच्यात झालेला व्यवहार हा नोंदणीकृत दस्ताने झालेला असतो.
दस्त नोंदणीच्या तारखेस खरेदी देणार व घेणार हे दोघेही हयात असतात.
ज्या क्षणाला खरेदी-विक्री व्यवहार कायदेशीरपणे पूर्ण होतो त्या क्षणाला खरेदी देणार याचा मिळकतीवरील मालकी हक्क खरेदी घेणार याच्याकडे हस्तांतरित होतो.
हक्काची नोंद ही दस्तावर आधारीत असते, खरेदी देणार किंवा खरेदी घेणार व्यवहार पूर्ण झाल्यावर मयत झाला तरीही मालकी हक्कात फरक पडत नाही.
मयताच्या वारसांची नावे अभिलेखावर घेऊन नोंद प्रमाणित करता येते.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in