कुलमुखत्यार पत्र
मन आणि प्रकृती निकोप असणारी सज्ञान व्यक्ती
कुलमुखत्यारपत्र करू शकते. जी व्यक्ती (स्त्री किंवा पुरूष) स्वत: जे जे काम करू शकतो किंवा शकते ते काम
त्याच्यावतीने दुसऱ्या व्यक्तीला कायदेशीर अधिकार देऊन करावयास सांगणे म्हणजे कुलमुखत्यारपत्र देणे होय. सध्या
मालमत्तेबाबतच्या कुलमुखत्यारपत्रास खरेदीखताप्रमाणे मुद्रांक शुल्क भरावे
लागते आणि असे कुलमुखत्यारपत्र नोंदणीकृत
करावे लागते.
जी कामे स्वत: हजर राहून केली जातात अशी सर्व कामे
मुखत्याराच्या वतीने त्याचा मध्यस्त करू शकतो. एकदा केलेले मुखत्यारपत्र सदर मूळ
मुखत्यार कधीही रद्द करू शकतो.त्यासाठी त्याला मुखत्यारपत्र धारकाच्या परवानगीची आवश्यकता नसते.
परंतू जर मुखत्यारधारकाने अशा मुखत्यारासाठी काही रकमेची
गुंतवणूक केली असेल तर मूळ मुखत्यार त्याला
जबाबदार असेल. अशा गुंतवणूकीच्या रकमेचा हिशोब पूर्ण झाल्याशिवाय मूळ
मुखत्यार सदर मुखत्यारपत्र रद्द करू शकत
नाही.
कुलमुखत्यार पत्रातील शर्ती व अटींचा कोणाही एकाने भंग
केला असेल तर असे नोंदविलेले कुलमुखत्यारपत्र
न्यायालयातून रद्द करून घ्यावे लागते.
कुलमुखत्यारपत्र रद्द करण्यासाठी सदर मुखत्याराने तशी
लेखी नोटीस मुखत्यारपत्र धारकास देणे आवश्यक आहे. पूर्वी झालेल्या रकमेचे व्यवहार पूर्ण झाले पाहिजेत.
कुलमुखत्यारपत्रातील शर्ती, अटींचा मजकूर नीट वाचून समजावून
घेतला पाहिजे.
⚫ कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र कायद्याने असू शकत नाही.
⚫ कुलमुखत्यारपत्राने संपूर्ण मालकी हक्क मिळत नाही.
⚫ कुलमुखत्यारपत्रातील अटींप्रमाणे नोंदविलेले खरेदीखत केल्यानंतर
मालमत्तेचा मालकी हक्क मिळतो.