Contact us on Telegram Chat Now! YouTube Channel Link!

मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1882 चे कलम 55

 

मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1882 चे कलम 55 

या कलमाच्या वाचनामुळे मालमत्ता खरेदी करणारा व मालमत्ता विक्री करणारा यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव  होऊ शकेल.

स्थावर मालमत्तेची विक्री करणारा व खरेदी करणारा यांच्या जबाबदाऱ्या व हक्क पुढील प्रमाणे. 

(1) विक्रीकर्त्यावर खालील गोष्टी बंधनकारक असतील.

(अ) मालमत्तेतील कुठल्याही प्रकारचे दोष, जे विक्रीकर्त्यास स्वत:स माहित असतील असे, खरेदीदारास  दाखवून देणे.

(ब) खरेदीदाराने मागणी केल्यास विक्रीकर्त्याने स्वत:कडे असलेली मालमत्ते संबंधातील सर्व कागदपत्रे  दाखवणे.

(क) खरेदीदाराने मालमत्ते संबंधात विचारलेल्या सर्व प्रश्नांना विक्रीकर्त्याने त्याच्याकडे असलेल्या सर्व  माहितीच्या आधारे उत्तरे देणे.

(ड) मालमत्तेच्या किंमती इतकी पूर्ण रक्कम खरेदीदाराकडून मिळाल्यानंतर खरेदीदारास सोयीस्कर अशा वेळी  यथायोग्य रीतीने मालमत्तेच्या हस्तांतरणासंबंधी (करार इत्यादी) प्रक्रिया पूर्ण करणे.

(इ) विक्री करार झाल्यानंतर व मालमत्तेच्या प्रत्यक्ष हस्तांतरणाच्या दिवसापर्यंत मालमत्तेची व स्वत:कडे  असलेल्या मालमत्तेसंबंधित कागदपत्रांची शक्य तितकी सर्व काळजी घेणे.

(फ) मालमत्ता ज्या प्रकारात मोडत असेल त्यास अनुसरून योग्य रीतीने ताबा खरेदीदारास वा त्याच्या  प्रतिनिधीस देणे.

(ग) विक्री करार होण्याच्या दिवसापर्यंत मालमत्तेसंबंधातील सर्व प्रकारचे सार्वजनिक कर, देयके, भाडे इत्यादी  पूर्णपणे भरणे.

(2) विक्रीकर्त्याने खरेदीदारास कबूल करणे आवश्यक आहे कि संबंधित मालमत्तेचा ताबा त्याच्याकडे असून तिचे  हस्तांतरण करण्याचे हक्क ही त्याच्याचकडे आहेत.

विक्री करणारा जर मालमत्तेचा विश्वस्त असेल तर त्याने खरेदीदारास शपथपूर्वक सांगणे आवश्यक आहे कि  त्याने असे कुठलेही कृत्य केलेले नाही कि ज्यामुळे मालमत्ता गहाणखत किंवा इतर तत्सम गोष्टीत अडकलेली  आहे किंवा काही कारणामुळे त्याला मालमत्तेचे हस्तांतरण करण्यापासून मज्जाव आहे.

या नियमात उल्लेख केलेल्या करारातून मिळणाऱ्या फायद्यांवर खरेदीदाराचा हक्क राहील आणि ज्या कुणाच्या  ताब्यात ही मालमत्ता कायदेशीरपणे दिली गेलेली असेल ते लोक असे हक्क बजावतील.

(3) जेव्हा संपूर्ण खरेदी-किंमत विक्रीकर्त्यास दिली गेलेली असेल तेव्हा विक्रीकर्त्यावर बंधन असेल कि त्याने  त्याच्या ताब्यात असलेली मालमत्तेसंबंधी सर्व कागदपत्रे खरेदीदारास द्यावीत, मात्र यास अपवाद असे  (अ) जेव्हा विक्रीकर्त्याने मालमत्तेतील काही भाग आपल्याकडे ठेवला असेल तेव्हा विक्रीपूर्वी एकत्रित  असणाऱ्या मालमत्तेची सर्व कागदपत्रे तो स्वत:कडे ठेऊ शकतो,आणि 

(ब) जेव्हा एका मालमत्तेचे अनेक हिस्से करून ते वेगवेगळ्या खरेदीदारास विकले गेले असतील तेंव्हा त्यातील  सर्वात मोठ्या खरेदीदाराकडे ती कागदपत्रे ठेवण्याचा हक्क असेल,मात्र या दोन्ही परिस्थितीत ज्यांच्याकडे  ती कागदपत्रे असतील त्यांच्यावर असे बंधन असेल कि खरेदीदारापैकी कुणीही सकारण विनंती करेल  तेव्हा त्यांनी अशी कागदपत्रे सादर करावीत व आवश्यकता असल्यास या कागदपत्राच्या सत्यान्वित प्रती  मागणीकर्त्याच्या खर्चाने उपलब्ध करून द्याव्यात.तसेच या नियमाप्रमाणे ज्यांच्याकडे अशी कागदपत्रे  ठेवलेली असतील त्यांनी ती सुरक्षित राखणे (अपघाती घटना वगळता) आवश्यक आहे.

(4) विक्रीकर्त्याकडे पुढील हक्क असतील;

(अ) जो पर्यंत मालमत्तेची मालकी खरेदीदाराकडे जात नाही तो पर्यंत मालमत्तेतून मिळणारे भाडे व इतर लाभ  असतील ते विक्रीकर्त्यास मिळत राहतील.

(ब) खरेदीदाराने विक्री किंमत संपूर्णपणे अदा करण्यापूर्वीच मालमत्तेचा ताबा त्याच्याकडे दिला गेलेला असेल  तर उर्वरीत रक्कम मिळेपर्यंत मालमत्तेवर विक्रीकर्त्याचा अधिकार राहील, तसेच अशा उर्वरीत रकमेवर  व्याज घेण्याचा अधिकारही विक्रीकर्त्याला असेल. 

(5) खरेदीदारावर पुढील बंधने असतील;

(अ) मालमत्ते संबंधात खरेदीदारास जर अशा काही गोष्टी माहित असतील कि ज्यांमुळे मालमत्तेची मूल्यवृध्दी  होणार असेल आणि अशा गोष्टींबाबत विक्रीकर्ता मात्र अनभिज्ञ असेल तर त्या गोष्टी विक्रीकर्त्याच्या  निदर्शनास आणून देणे. 

(ब) मालमत्तेसंबंधीचा विक्रीव्यवहार पूर्ण होत असलेल्या वेळी देय असलेली रक्कम विक्रीकर्ता अथवा त्याच्या  प्रतिनिधीस देणे आवश्यक आहे, मात्र अपवाद असा कि जर संबंधित मालमत्ता गहाण ठेवून काही कर्ज  शिल्लक असेल तर तेवढी रक्कम विक्रीकर्त्यास न देता संबंधितांना देण्यासाठी राखून ठेवणे.

(क) मालमत्तेचे हस्तांतरण पूर्ण झाल्यानंतर मालमत्तेसंबंधी देय असलेले सर्व प्रकारचे सार्वजनिक कर, भाडे  इत्यादी पूर्णपणे भरणे, तसेच संबंधित मालमत्ता गहाण ठेऊन कर्ज वगैरे पूर्वी घेतले गेलेले असेल तर अशा  कर्जाची आणि त्यावरील व्याजाची परतफेड करणे.

(6) खरेदीदाराकडे पुढील हक्क असतील;

(अ) मालमत्तेचे हस्तांतरण पूर्ण झाल्यानंतर त्या मालमत्तेतून मिळणाऱ्या सर्व फायद्यांवर खरेदीदाराचा हक्क  असेल, यात भाडे, मूल्यवृध्दी व इतर आनुषंगिक लाभांचा समावेश असेल.

(ब) खरेदीदाराने मालमत्तेची सर्व किंमत अदा केल्यानंतर मालमत्तेवरचा अधिकार खरेदीदाराकडे जाईल (त्याने  स्वत: अयोग्यरीत्या मालमत्तेचा ताबा घेणे नाकारले नाही तरच) व त्यापुढील काळात मालमत्तेतून  मिळणाऱ्या सर्व फायद्यांवर खरेदीदाराचा हक्क असेल, खरेदीदाराने योग्य प्रकारे आणि सबळ कारणासाठी  मालमत्तेचा ताबा घेणे नाकारले तर त्याने आधी अदा केलेल्या रकङ्केबद्दल वा संबंधित करार रद्द करण्यासाठी  दावा दाखल करावा लागल्यास त्याबद्दलच्या खर्चाची भरपाई भागवण्याबद्दलचा हक्क खरेदीदारास असेल. 

मालमत्तेचा शोध अहवाल तयार करताना, मालमत्ता गहाण घेताना तसेच मालमत्तेसंबंधीच्या विविध करारांचे लिखाण  करताना या कलमातील मार्गदर्शन उपयोगी पडू शकेल. 


About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.