साठेखत
मालमत्ता हस्तांतर कायद्याप्रमाणे कोणत्याही मिळकतीचे
साठेखत किंवा एखादा करार याद्वारे मिळकतीचे हस्तांतरण होत नाही. स्थावर मालमत्तेसाठी विकत घेणारा आणि
विकत देणारा यांच्यामध्ये परस्पर संमतीने ठरलेल्या अटी व शर्तीनुसार ठरलेल्या कालावधीत, कागदपत्रांची पूर्तता करून व नंतर शेवटी मालमत्तेचे हस्तांतरण नोंदणीकृत
खरेदीखताने करण्यात येईल अशा तपशीलातील
करार म्हणजे साठेखत होय.
साठेखतामधे पुढील तपशील असावा. मालमत्तेचे चतु:सीमेसह
अचूक वर्णन, मालमत्तेच्या हस्तांतरणाच्या प्रवासाचा इतिहास, विकासाचा तपशील,
मोबदला देण्याचा कालावधी आणि पायऱ्या, मोबदला
देण्याची पध्दत, कागदपत्रांची तपासणी, विविध परवाने
मिळविणे आणि त्याचा कालावधी, खरेदीचा व्यवहार खरेदीखत
नोंदविण्याची अंतिम मुदत, दिनांक या शिवाय परस्पर संमतीने ठरविलेल्या शर्ती-अटींसह साठेखताचे लिखाण
केले जाते.
सध्या साठेखतास किंवा खरेदी संबंधीच्या करारनाम्यास
मालमत्तेच्या किंमती प्रमाणे पूर्ण मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क भरावे लागते. ज्या मालमत्तेबाबतचे आपण साठेखत
केले आहे त्याच मालमत्तेबाबतचे खरेदीखत विहीत कालावधीत केले तर या खरेदीखतासाठी पुन्हा मुद्रांक शुल्क व
नोंदणी शुल्क भरावे लागत नाही.
मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयांनी दिलेल्या
विविध निकालाप्रमाणे विकास कामांसाठी लिहून दिलेला विकास करारनामा ऊर्शींशश्रेिाशपीं असीशशाशपीं
हा मानीव खरेदीखत समजण्यात यावा.तरी पण साठेखत किंवा विकास करारनामा यानंतर नोंदणीकृत खरेदीखत करणे आवश्यक
असते.मालमत्तेचा मालकीहक्क खरेदीखताने प्राप्त होतो.
खरेदीखताची नोंद अभिलेखात (ठशलेीवेष ठळसहीीं) मालकी हक्क
सदरी दाखल होते. विकसन कराराची नोंद इतर
हक्क सदरात लागू शकते. पण हा नियम नाही.