Close

हिंदू अविभक्त कुटुंबाकडून जमीन मालमत्ता विकत घेणे - कार्यपध्दती

 

हिंदू अविभक्त कुटुंबाकडून  जमीन मालमत्ता विकत घेणे - कार्यपध्दती

हिंदू अविभक्त कुटुंबाची संपूर्ण वंशावळ माहित करून घ्यावी. त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे वय, पत्ता, कुटुंबातील  कर्त्या पुरुषाशी नाते समजून घ्यावे. जी जमीन मालमत्ता खरेदी करायची आहे त्या मालमत्तेमधे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा  हिस्सा-वाटा किती आहे ? हे समजून घ्या. विशेषत: कुटुंबातील सर्व महिला सदस्यांचा हक्क लक्षात घ्यावा. कुटुंबाच्या  कर्त्यासह देय रकमेची विभागणी कुटुंबातील प्रत्येक सज्ञान व्यक्तींच्या नावे रोख रक्कम, चेक किंवा ड्राफ्ट देऊन प्रत्येक  व्यक्तीची स्वतंत्र पावती घ्या.तसेच एकत्र कुटुंब प्रमुख-कर्त्याकडून अभिव्यक्ती पत्र-इंडन्मिटी बाँड करवून घ्या. ज्यामध्ये  सदर व्यवहारापोटी फक्त एकत्र कुटुंबकर्त्याकडे दिलेली रक्कम तो कुटुंब प्रमुख 

(1) एकत्र कुटुंबाच्या कल्याणासाठी

(2) एकत्र कुटुंबाचे कर्ज फेडण्यासाठी

(3) एकत्र कुटुंबाची दुसरी मालमत्ता  विकसित करण्यासाठी. 

(4) एकत्र कुटुंबाचे धार्मिक कर्तव्य पालनासाठी खर्च करेल. कुटुंबातील सर्व सज्ञान, अज्ञान मुले  व महिलांचा वाटा-हिस्सा कुटुंब प्रमुख त्यांचा त्यांना देईल असा स्पष्ट उल्लेख इंडेन्मिटी बाँड मधे असावा. इंडेन्मिटी बाँड  निष्णात वकिलांकडून लिहून घ्यावा. नोंदणीकृत करावा. 

भारत सरकरने हिंदू वारसा (सुधारणा/संशोधन) कायदा 2005 संमत केला. हा 2005 चा 39 वा कायदा/अधिनियम  ता. 9 सप्टेंबर 2005 पासून अंमलात आला आहे. या कायद्याने भारतातील सर्व हिंदू मुलींना वडिलोपार्जित संपत्तीमधे  भावा इतका समान हिस्सा मिळाला आहे.

एकत्र कुटुंबातील सर्व सज्ञान व्यक्तींच्या सह्या खरेदीखतावर घ्याव्या. कायद्याने अज्ञान असलेल्या किंवा मानसिक  दृष्ट्या दुर्बल व्यक्तींच्या नावावर जमीन मालमत्तेचा स्वतंत्र हिस्सा असेल तर जिल्हा न्यायालयाची पूर्व परवानगी घेऊन  नंतर खरेदीचा व्यवहार करावा. 

अग्रहकाचा कायदा लक्षात घ्यावा

हिंदू एकत्र कुटुंबाची मालमत्ता कायदेशीररित्या विभक्त झालेली नाही अशा मालमत्तेच्या खरेदी पूर्वी अग्रहकाच्या  कायद्याचा विचार करा.

(1) 1956 चा हिंदू कायदा अंमलात आल्यानंतर मृत्युपत्र केलेले नाही अशा मृत व्यक्तीच्या मालमत्तेस पत्नी,  मुलगे, मुलगी, आई, मृत व्यक्तीची संतती इत्यादी वारस होतात. 

(2) या वारसांपैकी कोणाही वारसास त्याच्या हिश्श्याची मालमत्ता विकायची असल्यास इतर वारसांना त्याचा हिस्सा  विकत घेण्याबाबत अग्रहक्क आहे.

(3) स्वत:च्या हिश्श्याची मालमत्ता विकण्याआधी जी मालमत्ता विभक्त झालेली नाही, त्याच्या इच्छुकाने इतर  वारसांना विक्रीबाबत नोटीस देऊन कळविणे सोयीचे असते.

(4) नोटीस मिळाल्यानंतर न्यायालय ठरवेल त्या किंमतीस सदर हिस्सा खरेदी करण्याची तयारी न दाखविल्यास  इच्छुक वारसास आपली मिळकत तिèहाईत व्यक्तीस विकता येते.

(5) म्हणून हिंदू वारसा कायद्यातील कलम 22 चा विचार करणे अशा प्रकरणात आवश्यक आहे. (6) मुस्लीम व्यक्तीगत कायद्यांमध्ये अशा स्वरूपाची संकल्पना आहे. 


Comments

  1. Casinos in the UK - How to find good games - GrizzGo
    So, what do we หาเงินออนไลน์ mean by “casinos in the UK”? nba매니아 to find a casino and live casino games worrione on deccasino a mobile phone device in 2021. gri-go.com

    ReplyDelete

Content