Close

झोन दाखला, झोन नकाशा-विकास योजना अभिप्राय

 

झोन दाखला, झोन नकाशा-विकास योजना अभिप्राय 

यानंतर आपण ‘झोन दाखला’, ‘भाग नकाशा’ व ‘विकास आराखडा’ आहे. याबद्दल थोडी माहिती घेऊ ज्यामुळे  आपला जमिनीचा वापर करण्याबाबतचे आकलन विकसित होऊ शकेल. झोनचा दाखला - भाग नकाशा - विकास  योजना अभिप्राय यांचा उपयोग कसा करावा? आपल्याला कोणत्याही जमिनीवर अधिकृत कायदेशीर बांधकाम करायचे  असेल तर -

(1) जी जमीन ‘गावठाण’ म्हणून अभिलेखात दाखवली आहे अशा जमिनीवर बांधकाम करण्याआधी सदर जमीन  छ.अ. करण्याची बिनशेती परवानगी घेण्याची गरज नसते. पण इमारतीचे बांधकाम करण्यासाठी जिल्हाधिकारी,  नगर रचना विभाग, नगर विकास विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सक्षम विभागाची, अधिकाऱ्याची  पूर्वपरवानगी घ्यावी लागते. म्हणजेच इमारतीचा आराखडा मंजूर करून घ्यावा लागतो. ही परवानगी बांधकामाचे  ठिकाण कोणते आहे त्यावर अवलंबून असते. ज्या जमिनीवर बांधकाम करायचे आहे.त्या जमिनीसंबंधीचा झोन  दाखला व भाग नकाशा संबंधित नगररचना विभागाकडून मिळवा.

(2) झोन दाखला व भाग नकाशे किंवा झोन नकाशाचे अवलोकन करून आपल्याला जमिनीचा किंवा जमिनीच्या  भागाचा उपयोग कोणत्या प्रकारच्या इमारतीसाठी करता येईल ते समजते. (अ) निवासी (ब) व्यापारी (क)  औद्योगिक किंवा अन्य. तसेच जमिनीमधून जाणारे संभाव्य रस्ते, रस्त्यासाठी संपादित केली जाणारी जमीन समजते.

(3) जेव्हा आपल्याला निवासी, व्यापारी, औद्योगिक वा अन्य उद्देशासाठी बांधकाम करण्यासाठी जमीन खरेदी  करायची आहे. तेव्हा आपण संबंधित गावाचा ‘विकास योजना आराखडा’ ङ्कऊीरषीं ऊर्शींशश्रेिाशपीं झश्ररपङ्ख  ची प्रत मिळवा. असा आराखडा प्रस्तावित किंवा कायम केलेला असेल पण त्या ङ्कऊर्शींशश्रेिाशपीं झश्ररपङ्ख चे  अवलोकन करून आपल्याला जमिनीची निवड करता येईल.

(4) काही वेळा एका जमिनीचा, सर्व्हे नंबर/गट नंबर असलेल्या जमिनीचा उपयोग विविध कारणांसाठी करता  येईल असे झोन दाखला व भाग नकाशा (झोन नकाशा) दाखवतो. म्हणजे एकच जमीन निवासी, शेती ना  विकास, वनिकरण, संभाव्य रस्ता आपल्याला निवासी क्षेत्राची जमीनङ्खमोजणीङ्खकरून घ्यावी लागेल. तसेच  या जमिनीसाठी ‘विकास योजना अभिप्राय’ संबंधित नगर रचना विभागाकडून आधी मिळवावा. म्हणजे जमीन  विकत घेतल्यानंतरच्या नुकसानीस, मनस्तापास आपल्याला तोंड द्यावे लागणार नाही.

(5) अभिप्राय मिळाल्यानंतर सदर मालमत्तेची इमारत बांधण्यासाठी क्षमता, बांधकामासाठी एकूण उपलब्ध क्षेत्र व  मर्यादा माहीत होतील.

ज्या जमिनीचा झोन-वापर नगररचना-नगर विकास खात्याने जाहीर केलेला, ठरवलेला नसतो. किंवा ज्या  जमिनीचा समावेष कोणत्याही विकास आराखड्यात नसतो. अशा जमिनीवर बांधकाम करण्याआधी नगररचना नगरविकास  खात्याकडून विकास परवानगी साठी अभिप्राय मागा. नंतर योग्य ते परवाने घेऊन बांधकाम करा.


Comments

Content