प्रश्न :-
गाव नमुना सहामधील नोंद प्रमाणित झाल्यानंतर तलाठी यांनी काय कार्यवाही करावी?उत्तर :-
प्रमाणन अधिकारी यांनी गाव नमुना सहामधील नोंद प्रमाणित केल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना सात-बारा, गाव नमुना आठ-अ (खातेदारांची नोंदवही) तसेच जरुर त्या इतर सर्व संबंधीत गाव नमुन्यांवर सदर प्रमाणित गाव नमुना सहानुसार अंमल द्यावा.
असा अंमल देतांना संबंधीत गाव नमुना सहाचा अनुक्रमांक वर्तूळात नोंदवावा.
तसेच आवश्यकता असल्यास गाव नमुना सहामधील नोंदीशी संबंधीत सर्व हितसंबंधी व्यक्तींना सदर निर्णयाबाबत कळवावे.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in