गाव नमुना सहामध्‍ये मालकी हक्‍क बदलाच्‍या नोंदीबाबतच्‍या कागदपत्रांसाठी चेक-लिस्‍ट आहे काय?

प्रश्‍न :-

गाव नमुना सहामध्‍ये मालकी हक्‍क बदलाच्‍या नोंदीबाबतच्‍या कागदपत्रांसाठी चेक-लिस्‍ट आहे काय?

उत्तर :-

मालकी हक्‍क बदलाची नोंद गाव नमुना सहामध्‍ये नोंदवितांना तलाठी यांनी खालील बाबींची खात्री करावी.

  • नोंदणीकृत दस्‍ताशिवाय व्‍यवहार झाला आहे काय? (होय / नाहीP)
  • नोंदीसाठी दिलेली कागदपत्रे प्रमाणीत व योग्‍य आहेत काय? (होयP / नाही)
  • तुकडेजोड-तुकडेबंदी कायद्‍याविरुध्‍द व्‍यवहार झाला आहे काय? (होय / नाहीP)
  • परवानगीशिवाय बिगर शेतकरी व्‍यक्‍तीने जमीन खरेदी केली आहे काय? (होय / नाहीP)
  • कुळकायदा कलम ४३ चा भंग करुन व्‍यवहार झाला आहे काय? (होय / नाहीP)
  • कमाल जमीन धारणा कायद्‍याचा भंग करुन व्‍यवहार झाला आहे काय? (होय / नाहीP)
  • भूसंपादन कायद्‍याचा भंग करुन व्‍यवहार झाला आहे काय? (होय / नाहीP)
  • विविध निरसीत कायद्‍यांविरुध्‍द व्‍यवहार झाला आहे काय? (होय / नाहीP)
  • इतर हक्‍कातील बँक/सोसायटी बोजे असतांना ना हरकत दाखल्‍याशिवाय व्‍यवहार झाला आहे काय? (होय / नाहीP)
  • जमीनीचा धारणा प्रकार सक्षम अधिकार्‍याच्‍या परवानगीशिवाय व्‍यवहाराला संमती देतो काय? (होयP / नाही)
  • विविध कायद्‍यातील तरतुदींविरूध्‍द व्‍यवहार झाला आहे काय? (होय / नाहीP)
  • जमिनीच्‍या क्षेत्राचा मेळ बसतो काय? (होयP / नाही)
Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

About the author

Mahsul Guru
Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment