देवस्‍थान इनाम म्‍हणजे काय?

प्रश्‍न :-

देवस्‍थान इनाम म्‍हणजे काय?

उत्तर :-

देवस्‍थानाचे दोन प्रकार आहेत.

  1. (१) सरकारी देवस्‍थान: यांची नोंद गाव नमुना १(क) (७) आणि गाव नमुना तीन मध्‍ये केली जाते.
  2. (२) खाजगी देवस्‍थान: यांचा महसूल दप्‍तराशी संबंध नसल्‍याने त्‍यांची नोंद गाव दप्‍तरी नसते.

देवस्‍थान इनाम जमिनीतून येणार्‍या उत्‍पन्‍नातून, संबंधित मंदिर/मशिदीसाठी पुजा, दिवाबत्ती, साफसफाई, उत्‍सव यांचा खर्च भागवला जातो.

  • देवस्‍थान इनाम जमिनीच्‍या ७/१२ सदरी भोगवटादार (मालक) म्‍हणून देवाचे/देवस्‍थानचे नाव लिहावे. त्‍याखाली रेषा ओढून वहिवाटदार/व्‍यवस्‍थापकाचे नाव लिहिण्‍याची प्रथा आहे. परंतु या प्रथेमुळे कालांतराने, ७/१२ चे पुनर्लेखन करतांना, चुकून देवाचे नाव लिहिणे राहून जाते किंवा मुद्‍दाम लिहिले जात नाही. त्‍यामुळे पुढे अनेक वाद निर्माण होतात. त्‍यामुळे ७/१२ सदरी भोगवटादार (मालक) म्‍हणून फक्‍त देवाचे/देवस्‍थानचे नाव लिहावे, वहिवाटदार/व्‍यवस्‍थापकाचे नाव इतर हक्‍कात लिहावे.
  • देवस्‍थान इनाम जमिनीचा भोगवटादार (मालक) म्‍हणून ७/१२ सदरी पुजारी, महंत, मठाधिपती, ट्रस्‍टी, मुतावली, काझी यांची नावे कुळ म्‍हणून दाखल करु नये.
  • देवस्‍थान इनाम जमिनीचे हस्‍तांतरण, विक्री किंवा वाटप करता येत नाही. असे झाल्‍यास अशी जमीन सरकार जमा केली जाऊ शकते. असा अनधिकृत प्रकार तलाठी यांना आढळल्‍यास त्‍यांनी तात्‍काळ तहसिलदारला कळवावे.
  • अत्‍यंत अपवादात्‍मक परिस्‍थितीत शासनाची पूर्व परवानगी आणि धर्मदाय आयुक्‍तांच्‍या मान्‍यतेने असे हस्‍तांतरण किंवा विक्री करता येते.
  • देवस्थान इनाम वर्ग ३ ची जमीन खरेदी करण्यापूर्वी शासनाची आणि धर्मदाय आयुक्त अशा दोघांची परवानगी घेणे आवश्यक आहे. अशा दोन्ही परवानगी नसेल तर नोंद रद्द करावी.
Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

About the author

Mahsul Guru
Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment