लागवडीस अयोग्‍य, पडीक जमिनी आणि लागवडीस योग्‍य, पडीक जमिनी म्‍हणजे काय?

प्रश्‍न :-

लागवडीस अयोग्‍य, पडीक जमिनी आणि लागवडीस योग्‍य, पडीक जमिनी म्‍हणजे काय?

उत्तर :-

लागवडीस अयोग्‍य, पडीक जमिनी म्‍हणजे

  1. गावातील सरकारी तसेच खाजगी वनांखालील जमीनीचे क्षेत्र,
  2. डोंगराळ, खडकाळ भाग, वाळवंट, नद्‍यांखालील क्षेत्र,
  3. इमारती, रेल्‍वे, रस्‍ते, दफनभूमी, सैनिकी छावण्‍या, पाणीपुवठा साधने इत्‍यादी.

आणि लागवडीस योग्‍य, पडीक जमिनी म्‍हणजे

  1. काही विशिष्‍ठ कालावधीसाठी (५ वर्षे किंवा अधिक काळासाठी) पडीक ठेवलेल्‍या जमीनी,
  2. गवताळ आणि गुरे चारण्‍यासाठी वापरण्‍यात येणार्‍या जमीनी,
  3. वनांव्‍यतिरिक्‍त उपयुक्‍त झाडे असलेल्‍या जमीनी,
  4. इतर पडीक (एक ते पाच वर्षे काळासाठी) जमीनी,
  5. चालू पडीक (वर्षामध्‍ये फक्‍त एकाच हंगामात (खरीप किंवा रब्‍बी)) पडीक ठेवलेल्‍या जमिनी.
Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

Post a Comment