प्रश्न :-
लागवडीस अयोग्य, पडीक जमिनी आणि लागवडीस योग्य, पडीक जमिनी म्हणजे काय?उत्तर :-
लागवडीस अयोग्य, पडीक जमिनी म्हणजे
- गावातील सरकारी तसेच खाजगी वनांखालील जमीनीचे क्षेत्र,
- डोंगराळ, खडकाळ भाग, वाळवंट, नद्यांखालील क्षेत्र,
- इमारती, रेल्वे, रस्ते, दफनभूमी, सैनिकी छावण्या, पाणीपुवठा साधने इत्यादी.
आणि लागवडीस योग्य, पडीक जमिनी म्हणजे
- काही विशिष्ठ कालावधीसाठी (५ वर्षे किंवा अधिक काळासाठी) पडीक ठेवलेल्या जमीनी,
- गवताळ आणि गुरे चारण्यासाठी वापरण्यात येणार्या जमीनी,
- वनांव्यतिरिक्त उपयुक्त झाडे असलेल्या जमीनी,
- इतर पडीक (एक ते पाच वर्षे काळासाठी) जमीनी,
- चालू पडीक (वर्षामध्ये फक्त एकाच हंगामात (खरीप किंवा रब्बी)) पडीक ठेवलेल्या जमिनी.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in