प्रश्न :-
अधिकृत थकबाकी, अनधिकृत थकबाकी, एकूण मागणी आणि एकत्रीत जमीन महसूल म्हणजे काय?उत्तर :-
संकीर्ण जमीन महसूलाच्या नियत तारखेला येणे असलेली तसेच उपविभागीय अधिकार्याने पुढील वर्षी वसूलीसाठी पुढे आणण्यास संमती दिलेल्या थकबाकी रकमा म्हणजे अधिकृत थकबाकी.
उपरोक्त रकमा वगळून इतर सर्व थकबाकी अनधिकृत थकबाकी असतात. तहकुब रकमांचा जमीन महसुलाच्या थकबाकीत समावेश होत नाही.
एकूण मागणी म्हणजे नियत महसूल + संकीर्ण महसूल (येणे असलेला नियत महसूल माहित असतो म्हणून तो गाव नमुना आठ-अ मधून घेण्यात येतो, संकीर्ण (चढउतारी) महसूल गाव नमुना चार मधून घेतला जातो. आणि एकत्रीत जमीन महसूल म्हणजे नियत महसूल + संकीर्ण महसूल + स्थानिक उपकर (जि.प.; ग्रा.पं).
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in