प्रश्न :-
थकीत जमीन महसूलाची थकबाकी वसूल करण्याची कार्यपध्दती कशी असते?उत्तर :-
थकीत जमीन महसूलाची थकबाकी वसूल करण्याची कार्यपध्दती खालील प्रमाणे असते:
- जमीन महसूलाची थकबाकी ज्या दिनांकास देणे होईल त्याच्या दुसर्या दिवशी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६, कलम १७८ अन्वये नमुना नं. १ ची नोटीस बजावता येते.
- अशी थकबाकी नमुना नं. १ ची नोटीस बजावूनही थकबाकी वसूल न झाल्यास म.ज.म.अ., १९६६ चे कलम १७९ अन्वये, कलम १९२, १९३ च्या अधीन राहून, नमुना नं. २ ची नोटीस बजावून सदर जमीन सरकार जमा करता येते.
- अशी थकबाकी तरीही वसूल न झाल्यास महाराष्ट्र जमीन म.ज.म.अ., १९६६ चे कलम १८० अन्वये नमुना नं. २ ची नोटीस बजावून, जमीन अटकवून तिची विक्री करता येते.
- स्थावर मालमत्तेची जप्ती व विक्री म.ज.म.अ., १९६६ चे कलम १८१, १८२ व १८५ ते १९० अन्वये नमुना नं. ४ ची नोटीस बजावून करता येते.
- म.ज.म.अ., १९६६ चे कलम १८३ व १८४ अन्वये थकबाकीदारास अटक करून कैदेत ठेवता येते. तथापि, अशा अटक करून कैदेत ठेवण्यात आलेल्या थकबाकीदाराने अनुसूची ‘ब’ मधील नमुन्यात तारण दिल्यास त्याला म.ज.म.अ., १९६६ चे कलम १९१ अन्वये सोडुन देता येते.
- थकबाकीदाराच्या स्थावर मालमत्तेचा लिलाव म.ज.म.अ., १९६६ चे कलम १७९ अन्वये, कलम १९३,१९४ च्या अधीन राहून करता येतो.
- थकबाकीदाराकडील नाशवंत वस्तूंचा लिलाव म.ज.म.अ., १९६६ चे कलम १९६ अन्वये करता येतो.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in