उत्तर:
होय, भारतीय करार कायदा, १८७२, (Indian Contract Act, 1872) कलम २०१ अन्वये कुलमुखत्यारपत्र देणार्या व्यक्तीला कुलमुखत्यारपत्र रद्द
करण्याचा अधिकार असतो किंवा कुलमुखत्यारपत्रधारक कुलमुखत्यारपत्राचा त्याग करु
शकतो. कुलमुखत्यारपत्र देणार्याने कुलमुखत्यारपत्र रद्द केल्यास त्याबाबत त्याने
कुलमुखत्यारपत्रधारकास कळविणे अपेक्षित आहे.
- * सर्वसाधारणपणे कुलमुखत्यारपत्रधारकावर सोपवलेले काम पूर्ण झाल्यावर कुलमुखत्यारपत्र आपोआप रद्द ठरते. तथापि, प्रत्येक कुलमुखत्यारपत्रात ते कधी रद्द/प्रभावहिन ठरेल याचा उल्लेख जरूर असावा.
- * कुलमुखत्यारपत्र देणारी व्यक्ती किंवा कुलमुखत्यारपत्रधारक मरण पावल्यास कुलमुखत्यारपत्र आपोआप रद्द ठरते.
- * स्थावर मालमत्तेत
कुलमुखत्यारपत्रधारकाचा हक्क/अधिकार निर्माण करणारी कुलमुखत्यारपत्रे, कुलमुखत्यारपत्र देणारी व्यक्ती
मरण पावली तरी काम पूर्ण झाल्याशिवाय रद्द ठरत नाहीत. (उदा. सोसायटी
बांधकामासाठी कुलमुखत्यारपत्र देण्यात आले होते. बांधकाम सुरू असतांना
कुलमुखत्यारपत्रदेणार मयत झाला. अशा वेळेस कुलमुखत्यारपत्र देणारा मयत झाला म्हणून
कुलमुखत्यारपत्र रद्द न होता, कुलमुखत्यारपत्रात
नमूद केल्यानुसार बांधमाम पूर्ण झाल्यावर कुलमुखत्यारपत्र रद्द होईल)
* - * कुलमुखत्यारपत्र देणारी
व्यक्ती वेडी किंवा दिवाळखोर घोषित झाल्यास कुलमुखत्यारपत्र आपोआप रद्द ठरते.