उत्तर:
कुलमुखत्यारपत्राचा कायदा, १८८२
अन्वये जर कुलमुखत्यारपत्र एखाद्या स्थावर मालमत्तेत अधिकार निर्माण करणारे
नसेल तर ते नोंदणीकृत असणे आवश्यक नाही. परंतु जर कुलमुखत्यारपत्र, रुपये शंभरपेक्षा जास्त किंमतीच्या स्थावर मालमत्तेविषयी
केलेले असेल तर ते मुद्रांक शुल्कासह निबंधक कार्यालयातून नोंदणीकृत केलेले असणे
आवश्यक आहे. अन्य प्रकारचे कुलमुखत्यारपत्र नोटरीकडे नोंदविलेले असावे.
मिळकत विक्रीसाठी साधारण
कुलमुखत्यारपत्र पुरेसे नाही. (सर्वोच्च न्यायालय- सुरज लँप आणि प्रा. लि.
विरुध्द हरियाना राज्य व इतर)