Close

महसूल संबंधित व्‍याख्‍या 201 ते 206

 २०१. 'भूमीहीन व्‍यक्‍ती' म्‍हणजे ज्‍या व्‍यक्‍तीने, शेतीच्‍या प्रयोजनासाठी मालक म्‍हणून किंवा कुळ म्‍हणून कोणत्‍याही प्रकारची शेतजमीन धारण केलेली नाही व जी व्‍यक्‍ती मुख्‍यत: अंगमेहनतीने आपली उपजीविका करते आणि जिचा शेतीचा व्‍यवसाय करण्‍याचा हेतू आहे व ती जमीन कसण्‍यास समर्थ आहे. (महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ९-अ)

 

२०२. 'चावडी' म्‍हणजे गावाचा महसुली कारभार चालविण्‍यासाठी तलाठी यांच्‍याकडून वापरण्‍यात येणारी कार्यालयीन जागा. [.... कलम २()]

 

२०३. 'निर्वाहक क्षेत्र' म्‍हणजे जिरायत जमीन: १६ एकर (वरकस जमीन वगळता) अथवा हंगामात पाणी मिळणारी किंवा भात शेती जमीन: ८ एकर अथवा बारा महिने पाणी मिळणारी जमीन: ४ एकर.

जर एखाद्‍याने वरील जमिनींपैकी दोन किंवा अधिक प्रकारची जमीन धारण केली असेल तर, अशा जमिनींचे क्षेत्र कमाल क्षेत्रास लागू असलेल्‍या निकषांच्‍या आधारे ठरविण्‍यात येते. निर्वाहक क्षेत्राची परिगणना करतांना वरकस चमीन वगळण्‍यात येते. [महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ६]     

 

२०४. 'कमाल क्षेत्र' म्‍हणजे जिरायत जमीन: ४८ एकर अथवा हंगामात पाणी मिळणारी किंवा भात शेती जमीन: २४ एकर अथवा बारा महिने पाणी मिळणारी जमीन: १२ एकर.

जर एखाद्‍याने वरील जमिनींपैकी दोन किंवा अधिक प्रकारची जमीन धारण केली असेल तर,

अशा जमिनींचे कमाल क्षेत्र:

¨ बारा महिने पाणी मिळणार्‍या जमिनीच्‍या एक एकराबरोबर,

¨ हंगामात पाणी मिळणार्‍या किंवा भात शेती जमिनीच्‍या दोन एकराबरोबर,

¨ जिरायत जमिनीच्‍या चार एकराबरोबर आहे अशा आधारावर ठरविण्‍यात येते. [महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ५]        

२०५. अपील पुनरीक्षण पुनर्विलोकन तक्‍ता:

अपील

पुनरीक्षण

पुनर्विलोकन

.... कलम-२४७

.... कलम-२५७ 

.... कलम-२५८

सुनावणी आवश्यक

सुनावणी आवश्यक

सुनावणी आवश्यक

गुणवत्ता (Merit) नसेल तरीही सर्व मुद्द्यांवर करता येते.

 

१. कायदेशीरपणाची खात्री करण्यासाठी.

२. औचित्य भंग झाला असेल तर.

३. कार्यपध्दतीबद्दल शंका असेल तर.

या तीनच मुद्द्यांवर करता येते.

१. नवीन महत्वाच्या पुराव्यांचा शोध

२. पाहताक्षणी दिसून आलेली चूक

३. इतर पुरेसे कारण या तीन मुद्द्यांवर

करता येते.

पक्षकार दाखल करतो.

महसूल अधिकारी स्वत: किंवा अर्जावरून करू शकतात.

महसूल अधिकारी स्वत: किंवा अर्जावरून करू शकतात.

पुनरीक्षण किंवा पुनर्विलोकनात मूळ निर्णय बदलला तर त्याविरूध्द अपील करता येते.

(कलम-२४९ अन्वये)  

पुनरीक्षणाचा अर्ज फेटाळला गेला तर त्याविरूध्द अपील करता येत नाही.

(कलम-२५२ अन्वये)

पुनर्विलोकनाचा अर्ज फेटाळला गेला तर त्याविरूध्द अपील करता येत नाही.

(कलम-२५२ अन्वये)

वरिष्ठांकडे चालते.

वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकार्‍याकडील कागदपत्रे मागवून करतात.

ज्याने निर्णय दिला तो अधिकारी करू शकतो.

वरिष्ठांच्‍या परवानगीची आवश्यकता नाही.

वरिष्ठांची पूर्वपरवानगी आवश्यक.

लेखन प्रमादाशिवाय इतर कारणांसाठी वरिष्ठांची पूर्वपरवानगी आवश्यक.

मूळ आदेशानंतर ६० दिवसात दाखल करावे.

ठराविक कालावधी नमूद नाही तथापि, सर्वोच्च न्यायालयाने काही प्रकरणात निकाल देतांना मूळ आदेशानंतर ३ वर्ष मुदतीत करावे असे नमूद केले आहे.

मूळ आदेशानंतर ९० दिवसात करावे असे अपेक्षित आहे. परंतू बंधनकारक नाही.

 

२०६. गाव नमुने तक्‍ता

क्षेत्र आणि जमीन महसूल यासंबंधीचे महसुली लेख (गाव नमुने १ ते ५)

क्षेत्र आणि जमीन महसूल यासंबंधीचे महसुली लेख (गाव नमुने १ ते ५)

१- अ

१- ब

सुधारित १- क;

१ क (१) ते (१४);

परिशिष्‍ट – अ आणि परिशिष्‍ट – ब

जमिनींची नोंदवही

आकारबंद. जमाबंदी

मिस्‍ल-शेतवार पत्रक

वन जमिनींची नोंदवही

बिन भोगवट्‍याच्‍या (सरकारी) जमिनींची नोंदवही

भोगवटादार वर्ग दोन म्‍हणून मंजूर केलेल्‍या जमिनी आणि ग्रामपंचायतीकडे निहित केलेल्‍या जमिनी यांची नोंदवही

१- ड

१- इ

कुळ वहिवाट कायदा आणि महाराष्‍ट्र शेत जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम १९६१ च्‍या उपबंधानुसार अतिरिक्‍त म्‍हणून घोषित केलेल्‍या जमिनी दर्शविणारी नोंदवही.

शासकीय जमिनींवरील अतिक्रमणांची नोंदवही

अकृषिक महसुलाची नोंदवही

                      

 

दुमाला जमिनींची नोंदवही

                         

संकीर्ण जमीन महसूलाची नोंदवही

(सिवाई आमदानी – सिवाई जमाबंदी)                           

 

क्षेत्र आणि महसूल यांचा सर्वसाधारण गोषवारा

(ठरावबंद - किस्‍तबंदी खतावणी - जमाबंदी पत्रक)               

 

ज्‍या व्‍यक्‍तींकडून जमीन महसूल वसुली करावयाची आहे त्‍यांचे महसूल लेखे (गाव नमुने ६ ते ८अ)

६ - अ

६ - ब

६ - क

फेरफारांची नोंदवही

विवादग्रस्‍त प्रकरणांची नोंदवही

विलंब शुल्‍क प्रकरणांची नोंदवही

वारसा प्रकरणांची नोंदवही

६ - ड

७ - अ

७ - ब

नवीन उपभाग (पोट हिस्‍से) नोंदवही

अधिकार अभिलेख पत्रक

 

कुळवहिवाट नोंदवही

 

अधिकार अभिलेखानुसार जमीन कब्ज्यात असल्याचे मानण्यात येणार्‍या व्यक्ती व्यतिरिक्त इतर व्‍यक्‍तीची नोंदवही

८- अ

 

 

 

धारणा जमिनीची नोंदवही                 

 

वसूली व ताळेबंद संबंधीत महसूली लेखे (गाव नमुने ८ब ते १०अ)

८- ब

८- क

८- ड

येणे रकमा व वसूली यांची वार्षिक खातेवही व सर्व ठरावबंद बाबींच्‍या चाचणी ताळेबंदाची नोंदवही

(असामीवार खतावणी व लावणी पत्रक)

 

मागण्‍या व वसूली यांची वार्षिक खातेवही आणि जमीन महसुलाखेरीज इतर बाबी

(उदा. बांधबंदिस्‍ती विषयक येणे रकमांव्‍यतिरिक्‍त पाटबंधारे विषयक येणे रकमा, पोट-हिस्‍सा भूमापन फी, विक्रीकर, आयकर इत्‍यादी यांचा चाचणी ताळेबंद यांची नोंदवही

शासकीय येणे रकमांची व

इतर रकमांची रोख नोंदवही

 

दैनिक व जमापुस्‍तक (किर्द व जमापुस्‍तक)

 

९ - अ

९ - ब

१०

१० - अ

जमीन महसुलाखेरीज इतर येणे रकमांच्‍या वसुलीसाठी जमापुस्‍तक

(किर्द व जमापुस्‍तक)

गाव नमुना नऊची पावती पुस्‍तके व इतर पावती पुस्‍तके यांच्‍या संग्रहाची नोंदवही

 

       चलान

जमीन महसूलाच्या रकमेखेरीज इतर रक्कम कोषागारात भरणेचे चलान

 

प्रशासनाच्‍या आकडेवारीशी संबंधीत महसूली लेखे (गाव नमुने ११ ते १६)

११

१२

१३

१४

पिकांची आकडेवारी (जिन्‍नसवार पेरे पत्रक)

पिकांची नोंदवही

 

लोकसंख्‍या, गुरे व शेतकी अवजारे दर्शविणारी नोंदवही

 

पाणीपुरवठ्‍याच्‍या साधनांची नोंदवही

 

१५

१६

 

आवक - जावक नोंदवही

पुस्‍तके, नियम पुस्‍तिका व स्‍थायी आदेश इत्‍यादींची सूची

संकीर्ण गाव नमुने आणि नोंदवह्‍या १७ ते २१

१७

१८

१९

२०

संकीर्ण महसूल बसवण्यासंबंधीचे प्रतिवृत्त नोंदवही

मंडलअधिकारी यांची आवक - जावक नोंदवही (बारनिशी)

तलाठी/मंडलअधिकारी यांच्‍या ताब्‍यात असलेल्‍या शासकीय मालमत्तेची नोंदवही

तलाठी/मंडलअधिकारी यांच्‍यासाठी पोस्‍टाच्‍या तिकिटांची नोंदवही

 

२१

 

मंडलअधिकारी यांची मासिक दैनंदिनी

संकीर्ण फाईल्‍स (एक ते सात)

एक

दोन

तीन

चार

वार्षिक प्रतिवृत्त

गावाचा नकाशा किंवा गट पुस्‍तक

कमी-जास्‍त पत्रके

आकारफोड पत्रके

पाच

सहा

सात

 

उप निबंधकाकडून पुरविण्‍यात आलेली अ पत्रके

फेरफार नोंदवहीतील नोंदीसंबंधी आदेश व सूचना

संकीर्ण कागदपत्रे

इतर

तलाठ्‍याचे कार्यभार प्रतिवृत्त

ग्राम आदर्श तक्‍ता

Comments