प्रश्न :-
सध्या किती प्रकारची इनाम/वतन अस्तित्वात आहेत?उत्तर :-
स्वातंत्र्यपूर्व काळात ७ प्रकारची इनामे असली तरी सध्या खालील तीन प्रकारची इनामे अस्तित्वात आहेत.
- संकीर्ण इनाम- (इनाम वर्ग-७): सार्वजनिक कारणांसाठी महसूल कायद्यातील तरतुदींन्वये विशिष्ठ अट आणि सारा माफीने, कब्जेहक्काची किंमत न घेता दिलेल्या जमिनी. या जमिनी काही ठराविक कामांकरिता महसूल माफीने दिल्या जातात त्यांचा समावेश इनाम वर्ग-७ मध्ये होतो. उदा. शाळा, महाविद्यालये, दवाखाने, क्रिडांगणे इत्यादींना काही अटींवर दिलेल्या जमीनी. अशा जमिनींची नोंद गाव नमुना २ व ३ मध्ये असते.
- देवस्थान इनाम-(इनाम वर्ग- ३): देवस्थान इनाम म्हणजे देवदेवता किंवा अन्य धार्मिक स्थळांच्या व्यवस्थेसाठी दिलेली जमीन.
- सरंजाम इनाम-(इनाम वर्ग-१): महाराष्ट्रात फक्त सातारा जिल्ह्यात सरंजाम इनाम अस्तित्वात आहे.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in