प्रश्न :-
नगर भूमापन झालेल्या क्षेत्रात सात-बारा वर किंवा पिक पहाणीची नोंद करावी काय?उत्तर :-
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग परिपत्रक क्रमांक एस-१४९७/प्र.क्र-५१३/ल-६, दिनांक २४/११/१९९७ अन्वये खालील सूचना दिलेल्या आहेत.
ज्या क्षेत्रात भूमापनाचे काम पूर्ण झाले आहे आणि त्या क्षेत्रातील मिळकतींची मिळकत पत्रे तयार झालेली आहेत अशा जमिनींबाबत सात-बाराचा वापर करण्यात येऊ नये. मिळकत पत्र हेच अशा जमिनीचे कायदेशीर कागदपत्र समजावे.
ज्या क्षेत्रात भूमापनाचे काम पूर्ण झाले आहे परंतू त्या क्षेत्रातील मिळकतींची मिळकत पत्रे तयार करण्याचे काम पूर्ण झाले नाही अशा क्षेत्रातील ज्या जमिनी बिनशेतीकडे वर्ग झालेल्या आहेत त्या जमिनींवर पिक पहाणीची नोंद करू नये.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in