प्रश्न :-
एका व्यक्तीला अतिक्रमण नियमित करुन सरकारी पट्टेदार म्हणून जमीन दिली गेली. सदर पट्टेदार त्या जमिनीचे बक्षिस पत्र करू शकतो काय अथवा पट्टेदार मयत झाल्यास अशा जमिनीस त्याच्या वारसाची नावे लागू शकतील काय?उत्तर :-
म.ज.म.अ. कलम ३८ अन्वये सरकारी पट्टेदाराची व्याख्या दिली आहे. पट्टेदार म्हणजे भाडेकरू. अशा पट्टेदाराला काही मुदतीसाठी, अटी-शर्तीच्या आधिन ठेवून जमीन तात्पुरत्या स्वरूपात वहिवाटीसाठी देण्यात येते.
अशा जमिनीचे मूळ मालक शासन असते. त्यामुळे शासनाच्या परवानगी/आदेशाशिवाय, पट्टेदार अशा जमिनीचे बक्षिस पत्र इ. द्वारे हस्तांतरण करू शकत नाही.
तसेच अशा जमिनीवर शासनाच्या परवानगी/आदेशाशिवाय वारसाची नावे लावता येत नाही.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in