उत्तर: महसूल वर्ष १ ऑगस्टला सुरु होऊन ३१ जुलै रोजी संपते. जमाबंदी म्हणजे महसूल वर्षाच्या शेवटी, गाव खाती पूर्ण करुन त्या खात्यांचा तालुका खात्याबरोबर बसविलेला ताळमेळ.
जमाबंदीशी संबंधीत गाव नमुने:-
- गाव नमुना- १ हा गावच्या महसूल खात्याचा सुरुवातीचा टप्पा आहे. यात शेत जमीनीचे सर्व्हे नंबर निहाय कर मूल्यांकन तसेच गावाबाबतची इतर आवश्यक माहिती दर्शविलेले असते. यात लागवडीखालील क्षेत्र, लागवडीखाली नसलेले क्षेत्र, विशेष कारणासाठी राखीव क्षेत्र, कर मूल्यांकन यांची माहिती मिळते.
- गाव नमुना- २ यामधुन अकृषीक, कायम जमीन महसूलाची माहिती मिळते. यात (१) गावठातील जमीन आणि (२) गावठाणाच्या बाहेरील जमीन असे दोन भाग असतात. यातच पुढे (१) रहिवास (२) औद्योगिक (३) व्यापारी (४) अंशत: महसूलास पात्र (५) महसूल माफीस पात्र या पाच प्रकारची माहिती असते.
- गाव नमुना- ३ यात दुमाला जमीनीची माहिती मिळते.
- गाव नमुना- ४ हा गाव नमुना १ ते ३ कायम जमीन महसूलाशी संबंधीत असून, गाव नमुना ४ हा अस्थायी, संकिर्ण जमीन महसूलाशी जो पाच वर्षापेक्षा कमी काळासाठी कायम असतो त्याच्याशी संबंधीत आहे.
- गाव नमुना नं. ८अ (खातेदारांची नोंदवही)
- गाव नमुना नं. ८ब (येणे रकमा व वसूली ताळेबंद)
- गाव नमुना नं. ९ (दैनिक जमापुस्तक)
- गाव नमुना नं. १० (जमीन महसूल चलन)