Close

महाराष्ट्रातील काही झोनचे प्रकार

 

महाराष्ट्रातील काही झोनचे प्रकार 

जमिनीचा वापर कोणत्या कारणासाठी करता येईल हे शासन ठरवते. झोन निश्चित करते.

(1) रहिवास विभाग

(2) सार्वजनिक-निमसार्वजनिक विभाग

(3) औद्योगिक विभाग

(4) शेती व नाविकास विभाग

(5) वनीकरण विभाग

(6) वनक्षेत्र

(7) हरीत पट्टा

(8) जलाशय

(9) नदी, नाले

(10) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडल यांचेसाठी निर्वेशित क्षेत्र

(11) ट्रक-टर्मिनस-वाहनतळ

(12) हिलटॉप-हिल स्लोप विभाग

(13) गाव हद्द

(14) महानगरपालिका/नगर परिषद हद्द

(15) संरक्षण विभाग

(16) प्रस्तावित रस्ते/रूंदीकरण 

(17) शुध्दीपत्रकानुसार प्रस्तावित केलेले बदल

(18) विशिष्ट उद्देशासाठी राखीव/आरक्षित क्षेत्र असे अनेक झोन आहेत

34/ जङ्कीन ङ्कालङ्कत्तेची सुरक्षित खरेदी सुत्रबद्ध पद्धत

झोन समजण्यासाठी प्रस्तावित/अंतिम प्रादेशिक योजना वा अन्य विकास योजना यांचा आराखडा पहावा. जमिनीचा आपल्याला अपेक्षित असलेला वापर आणि झोन यामध्ये विसंगती असता कामा नये. म्हणून विकास योजना  अभिप्राय मिळवणे आवश्यक ठरते.

एकाच जमिनीवर एकापेक्षा जास्त झोनची अंतर्गत हद्द व सीमा निश्चित करण्यासाठी शासनाच्या सक्षम विभागाकडून  मोजणी करून घ्यावी.नंतर बांधकाम परवानगीसाठी योग्य ती प्रक्रिया करावी.

झोनचा दाखला व झोन नकाशावर झोनचा प्रकार विविध चिन्हे आणि विविध रंगांचा उपयोग करून दाखविलेले  असतात. त्याविषयी स्वत: माहिती घ्या.उदा.पिवळा-रहिवास विभाग,निळा-जलाशय इत्यादी.


Comments