महसूल संबंधित व्‍याख्‍या 121 ते 130

 



१२१. 'जातीने किंवा व्‍यक्‍तिश: जमीन कसणे' म्‍हणजे स्वत:च्या अंगमेहनतीने किंवा स्वत:च्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या अंगमेहनतीने आणि मजुरीने कामावर लावलेल्या मजुरांकरवी किंवा रोख रकमेत किंवा मालाच्या रुपात, परंतु पिकाच्या हिश्श्याच्या रुपात नव्हे-देय असलेल्या नोकराच्या प्रसंगोपात मदतीने कोणतीही जमीन कसणे. [महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम, १९७१, नियम २() आणि महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम २०११, कलम २(६)]

 

१२२. 'ओलीताची जमीन' म्हणजे, कोणतीही पाटबंधाऱ्याच्या बांधकामाद्वारे जलसिंचिन प्राप्‍त होणारी जमीन. [महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम, १९७१, नियम २()]

 

१२३. 'अनुसूचित जाती' म्हणजे भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३४१ अन्वये, अनुसूचित जाती म्हणून समजण्यात येत असतील अशा जाती, वंश किंवा जमाती अशा जातीचे, वंशाचे किंवा जमातीचे भाग किंवा त्यातील गट. [महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम, १९७१, नियम २()]

 

१२४. 'अनुसूचित जमाती' म्हणजे भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३४२ अन्वये अनुसूचित जमाती म्ह्णून समजण्यात येत असतील अशा जमाती किंवा जनजाती समूह किंवा अशा जमातीचे किंवा जनजाती समूहाचे भाग किंवा त्यातील गट. [महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम, १९७१, नियम २()]

 

१२५. 'गाळपेर जमीन' म्हणजे राज्य शासनाकडे निहित असेल अशी नदी, नाले, तलाव, सरोवर, जलाशय, बांध, पाट, जलमार्ग आणि सर्व स्थिर आणि प्रवाही पाण्याच्या तळाशी स्थित असलेली जमीन, जी नैसर्गिक  प्रक्रियेमध्ये पाणी कमी झाल्यामुळे दिसू लागते आणि सामान्यत: कृषिसाठी उपलब्ध होते. परंतु यामध्ये म.ज.म. अधिनियमाच्या कलम ३२ आणि ३३ यामध्ये निर्दिष्ट केलेल्या जमिनीचा समावेश होत नाही. [महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम, १९७१, नियम २()(१)]

 

१२६. 'अधिकृत सलग सीमा चिन्हे' म्‍हणजे सीमा पट्टा किंवा धुरा, सरबांध किंवा कुंपण आणि भिंतीसारखी इतर कायम स्वरूपाची सलग बांधकामे. [महाराष्ट्र जमीन महसूल (सीमा व सीमा चिन्हे) नियम, १९६९, नियम ३]

 

१२७. 'खंडित सीमा चिन्हे' म्‍हणजे ओबडधोबड आकार दिलले लांबुडके दगड, ताशीव दगडाचे खांब किंवा सिमेंटचे चिरेबंदी खांब किंवा निमुळता पाया घालून जमिनीत घट्ट बसविलेले सिमेंट किंवा चुना यांचे खांब किंवा माती, सिमेंट किंवा चुन्यामध्ये बसविलेल्या पक्क्या विटांचे बनविलेले खांब, लोलकाकृति, आयताकृती किंवा कोणाकृती उंचवटा किंवा सुट्या दगडांचा बुरुज किंवा भू-भागासाठी योग्य वाटतील अशी भूमी अभिलेख संचालकांनी मान्यता दिलेली इतर चिन्हे. [महाराष्ट्र जमीन महसूल (सीमा व सीमा चिन्हे) नियम, १९६९, नियम ३]

 

१२८. फाजिंदार आणि फाजिंदारी कुळे म्हणजे नियत जमीन भाडे भरून, सेवानिवृत्ती व कर भू-धारणापद्धतीवर राज्य शासनाकडून जमीन अखंडतेने धारण करीत असेल आणि जिने इमारती व इतर बांधणी उभारण्याच्या प्रयोजनार्थ अशी जमीन किंवा तिचे भाग, इतर व्यक्तींना रूढ किंवा संमत भाडे भरल्यावर पट्ट्याने दिलेली असेल अशी व्यक्ती, ज्या इतर व्यक्तींना अशी जमीन किंवा तिचे भाग पट्ट्याने देण्यात आले असतील त्या व्यक्तींनाफाजिंदारी कुळेअसे संबोधण्यात येईल. [संकीर्ण- मुंबई शहर (इनामी व विशेष) भू-धारणापद्धती नाहीशा करण्याबाबत आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम (सुधारणा) अधिनियम, १९६९, नियम २(४)]

 

१२९. फाजिंदारी जमीन म्हणजे फाजिंदाराने धारण केलेली आणि म.ज.म. अधिनियम, कलम ३०५ अन्वये ठेवलेल्या नोंदणीपुस्तकांमध्ये व सारा यादीमध्ये अशी (जमीन) म्हणून नोंद केलेली जमीन. [संकीर्ण- मुंबई शहर (इनामी व विशेष) भू-धारणापद्धती नाहीशा करण्याबाबत आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम (सुधारणा) अधिनियम, १९६९, नियम २(५)]

 

१३०. भू-धारणा निरास कायदे म्हणजेसाष्टी इस्टेट (जमीन महसूलाची सूट रद्द करणे) अधिनियम, १९५१,’ ‘मुंबई जातइनामे नाहीशी करण्याबाबत अधिनियम, १९५२,’ ‘मुंबई विलीन क्षेत्रे व प्रदेश(जहागिर्‍या नाहीशा करण्यासंबंधी) अधिनियम, १९५३,’ ‘मुंबई विलीन प्रदेश किरकोळ दुमाला वहिवाटी नाहीशा करण्याबाबत अधिनियम, १९५५,’ आणि मुंबई शहर (इनामी व विशेष भू-धारणापद्धती) नाहीशी करण्याबाबत आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६९. [संकीर्ण- महाराष्ट्र विवक्षित भूमि अधिनियमातील विद्यमान खाण व जमीन मालकी हक्क नाहिसे करण्याबाबत अधिनियम, १९८५, नियम ३(ड)]


About the author

Mahsul Guru
Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment