२१. 'विधि व्यवसायी' म्हणजे,
अधिवक्त्यांबाबत अधिनियम, १९६१ यात, या संज्ञेचा
दिलेला अर्थ. [म.ज.म.अ. कलम २(२०)]
२२. 'अकृषिक आकारणी' म्हणजे, अकृषिक प्रयोजनांसाठी केलेल्या
जमिनीच्या उपयोगाच्या
संदर्भात,
म.ज.म.अ. च्या तरतुदीं/
नियमांन्वये कोणत्याही जमिनीवर निश्चित केलेली आकारणी. [म.ज.म.अ. कलम २(२१)]
२३. 'भोगवट्याची जमीन' म्हणजे, भोगवटादाराने धारण केलेल्या जमिनीचा
भाग. [म.ज.म.अ. कलम २(२२)]
२४. 'भोगवटादार' म्हणजे, कुळ किंवा शासकीय
पट्टेदार खेरीज करुन, बिनदुमाला जमिनीचा प्रत्यक्ष कब्जा असलेला
धारक. प्रत्यक्ष कब्जा असणारा धारक
हा कुळ असेल त्याबाबतीत, तर भूमिधारक किंवा वरिष्ठ जमीन मालक हा भोगवटादार आहे असे मानण्यात येईल. [म.ज.म.अ. कलम २(२३)]
२५. 'भोगवटा' म्हणजे कब्जा [म.ज.म.अ. कलम २(२४)]
२६. 'जमिनाचा भोगवटा करणे' म्हणजे जमीन कब्जात असणे किंवा कब्जात
घेणे. [म.ज.म.अ. २(२५)]
२७. 'पार्डी जमीन' म्हणजे, गावठाणातील घरांशी संबंधित असलेली,
लागवड केलेली जमीन.
[म.ज.म.अ. २(२६)]
२८. 'लोकसंख्या' म्हणजे, ज्या जनगणनेची संबंधित आकडेवारी प्रसिद्ध
करण्यात आली आहे अशा निकटपूर्वीच्या जनगणनेत ठरविलेली
लोकसंख्या. [म.ज.म.अ. कलम २(२७)]
२९. 'विहित' म्हणजे, शासनाने या अधिनियमान्वये केलेल्या नियमांद्वारे
विहित केलेले. [म.ज.म.अ. कलम २(२८)]
३०. 'मान्यताप्राप्त अभिकर्ता' म्हणजे, म.ज.म. अधिनियमान्वये करण्यात येणार्या कार्यवाहीत कोणत्याही पक्षकाराच्यावतीने उपस्थित राहण्यासाठी,
अर्ज करण्यासाठी आणि इतर कामे करण्यासाठी
लेखी प्राधिकृत केलेली व्यक्ती. [म.ज.म.अ. कलम २(२९)]