हक्कांची नोंद कशी होते?
कोणत्याही मालमत्तेचे हस्तांतरण (नॉमिनेशन) नामांकनाने
होत नाही.
भागीदारी संस्थेची मालमत्ता - जर एखादी मालमत्ता
भागीदारी संस्थेची असेल तर सर्व भागीदार मिळूनच हस्तांतरणाचा व्यवहार करू शकतात.इतर भागीदारांनी मिळून एका
भागीदाराला प्रत्यक्ष नोंदणीकृत कुलमुखत्यारपत्र (रजिस्टर्ड पॉवर ऑफ अॅटर्नी) दिली असेल तरच त्या व्यक्तीशी
हस्तांतरण व्यवहार करावा. भागीदारी कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करून भागीदारी संस्थेला असलेली सर्व देणी, कर्जे याची माहिती मिळवून नंतर व्यवहार करावा.
सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 नुसार सहकारी संस्थेस स्वत:ची मालमत्ता योग्य ते निकष, सर्वसाधारण संस्थेचा ठराव आणि
विभागीय सहकार निबंधकाची पूर्वपरवानगी घेऊन हस्तांतरीत करता येते. ख्रिश्चन
धर्मीयांच्या चर्चच्या मालमत्तेचे हस्तांतरण करण्याआधी द बॉम्बे पब्लीक ट्रस्ट अॅक्ट
1950 प्रमाणे धर्मादाय
आयुक्तांची व संबंधित ख्रिश्चन पंथाच्या धर्मगुरूची पूर्वपरवानगी घेऊन करता
येते.
ट्रस्ट - न्यास विषयक कायद्याने (ट्रस्ट) नोंदणीकृत
केलेल्या संस्थेची मालमत्ता धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीने व योग्य प्रक्रियेनंतर न्यासविषयक कायद्यातील
तरतुदींप्रमाणे हस्तांतरीत करता येते.
कंपनी - कंपन्यांची मालमत्ता - कंपनी कायदा, कंपनीचे मेमोरँडम व आर्टीकल्स ऑफ असोसिएशन मधील तरतुदींचा अभ्यास करून हस्तांतरीत करावी.
दिवाळखोर - दिवाळखोराच्या मालमत्तेच्या हस्तांतरणाचे
सर्व अधिकार योग्य त्या कोर्टरिसिव्हरकडे अबाधित असतात, म्हणून दिवाळखोरांशी
मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये.
मुस्लीम देवस्थानची - पीराची जमीन वक्फ बोर्डाच्या पूर्वपरवानगीने हस्तांतरीत होते.