उत्तर:
नाही, अशी कोणतीही कायदेशीर तरतुद
नाही. काही वेळेस तलाठी अशा शेर्यांचा अर्थ ‘वरिष्ठ कार्यालयाकडील आदेश’ असा
चूकीचा लावून त्यानुसार फेरफार नोंदही नोंदवतात. काही मंडलअधिकारीही ‘तहसिलदार कार्यालयाकडील आदेश पाहून नोंद मंजूर’ असा शेरा ठेऊन नोंद प्रमाणित करतात. ही काही ठिकाणी
सर्रास वापरली जाणारी चुकीची आणि बेकायदेशीर पध्दत आहे.
‘नियमानुसार उचित
कार्यवाही करावी’ असा शेरा लिहून वरिष्ठ
कार्यालयाकडून आलेल्या अर्जांबाबत, वरिष्ठ
कार्यालयाशी चर्चा करण्यास काही तलाठी आणि मंडलअधिकार्यांच्या मनात भिती किंवा
न्यूनगंड असतो.
खरेतर वरिष्ठ कार्यालयाने ‘नियमानुसार उचित कार्यवाही करावी’ असे मोघम शेरे लिहिणे बंद करावे. नियमानुसार
कार्यवाही करण्याची असल्यास कोणत्या नियम व कलमानुसार कार्यवाही करावी याचा स्पष्ट
उल्लेख करायला हवा.
तलाठी आणि मंडलअधिकारी
यांनीसुध्दा वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या कागदावर ‘शेरा’ आहे की
तो ‘आदेश’ आहे याची प्रथम खात्री करावी.
तलाठी यांनी ‘नियमानुसार उचित कार्यवाही करावी’ असे मोघम शेरे लिहून त्यांच्याकडे आलेल्या कोणत्याही
प्रकारच्या अर्जावर/पत्रावर 'मा.
महोदय, सदर अर्जावर/पत्रावर नेमकी काय
व कोणत्या कायदेशीर तरतुदींन्वये कार्यवाही करावी याचा बोध होत नाही. कृपया स्पष्ट
खुलासा/मार्गदर्शन करावे अशी विनंती आहे.' असे लिहून,
तो अर्ज प्रेषकाकडे नम्रपणे परत
पाठवावा.