गाव नमुना सहा-ड (नवीन उपभाग (पोट हिस्‍से) नोंदवही) मध्‍ये केवळ वाटण्‍या झाल्‍यामुळे होणारे भूमापन क्रमांकातील नवीन हिस्‍स्‍यांचाच समावेश होतो हे म्‍हणणे योग्‍य आहे काय?

प्रश्‍न :-

गाव नमुना सहा-ड (नवीन उपभाग (पोट हिस्‍से) नोंदवही) मध्‍ये केवळ वाटण्‍या झाल्‍यामुळे होणारे भूमापन क्रमांकातील नवीन हिस्‍स्‍यांचाच समावेश होतो हे म्‍हणणे योग्‍य आहे काय?

उत्तर :-

नाही, गाव नमुना सहा-ड नवीन उपभाग (पोट हिस्‍से) नोंदवही मध्‍ये केवळ वाटण्‍या झाल्‍यामुळे होणारे भूमापन क्रमांकातील नवीन हिस्‍स्‍यांचाच समावेश होत नाही तर संपादन, एकत्रीकरण, मळईची जमीन, पाण्‍याने वाहून गेलेली जमीन, अकृषिक जमीन यांसारख्‍या अनेक कारणांमुळे सीमांमध्‍ये होणारे सर्व बदलसुध्‍दा दर्शवले जातात.

यासाठी तलाठी यांनी असे पोटहिस्‍से झालेल्‍या जागेला प्रत्‍यक्ष भेट देणे आणि झालेले बदल नोंदविणे आवश्‍यक असते.

या बदलांप्रमाणे मोजणी करुन नवीन सीमाचिन्‍हे व हद्‍दी भूमी अभिलेख विभागामार्फत निश्‍चित करण्‍यात येतात.

Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

إرسال تعليق