प्रश्न :-
मुंबईला राहणाऱ्या जमीन मालकाची जमीन एखादी अन्य व्यक्ती गेली १० वर्षे स्वत: कसत आहे. त्याला जमिनीतून काढून टाकण्यासाठी जमिन मालकाने मनाईचा दावा लावला होता. तो दिवाणी न्यायालयाने फेटाळला आहे. आता जमीन कसणार्या व्यक्तीने स्वत:चे नाव सात-बाराला कब्जेदार सदरी लावावे म्हणून अर्ज केला आहे. काय निर्णय घ्यावा?उत्तर :-
सदर अन्य व्यक्ती मूळ जमीन मालकाच्या संमतीशिवाय जमीन वहिवाटत आहे असे दिसते.
कोणत्याही जमिनीच्या मालकी हक्कांत 1. नोंदणीकृत दस्ताने, 2. वारस तरतुदींन्वये आणि 3. न्यायालयाच्या किंवा सक्षम अधिकार्याच्या आदेशानेच बदल होऊ शकतो. या प्रकरणात तिन्हीपैकी एकही बाब दिसून येत नाही.
मनाई आदेश व जमिनीतील हक्क संपादन या दोन्ही भिन्न आणि स्वतंत्र बाबी आहेत. जमीन मालकाचा मनाई आदेश न्यायालयाने फेटाळला म्हणून सदर अन्य व्यक्ती जमिनीची आपोआप मालक होत नाही.
अनाधिकाराने अथवा दंडेलशाहीने जमिनीचा कब्जा घेणार्या इसमाविरूध्द महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे कलम 59 आणि कलम 242 अन्वये कारवाई करता येईल.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in