कोणत्‍याही कायदेशीर दस्‍तावरुन गाव नमुना सहामध्‍ये नोंद घेतांना तलाठी यांनी काय खबरदारी घ्‍यावी?

प्रश्‍न :-

कोणत्‍याही कायदेशीर दस्‍तावरुन गाव नमुना सहामध्‍ये नोंद घेतांना तलाठी यांनी काय खबरदारी घ्‍यावी?

उत्तर :-

कोणत्‍याही दस्‍तावरुन गाव नमुना सहामध्‍ये नोंद घेतांना, संबंधीत मिळकतीबाबत झालेला जुना फेरफार जरूर बघावा.

उदा. 'अ' ने 'क' ला मिळकत विकली. 'क' ने नोंदीसाठी अर्ज केल्‍यावर 'अ' चे नाव सदर मिळकतीवर कोणत्‍या फेरफारने आले ते जरूर बघावे.

यामुळे सदर मिळकत विकण्‍याचा हक्‍क फक्‍त 'अ' ला होता की या व्‍यवहाराला इतरही सहधारकाच्‍या परवानगीची आवश्‍यकता होती ते समजेल. अशीच दक्षता इतर सर्व नोंदीं (विशेषत: वारस नोंदी) करतांनाही घ्‍यावी.

Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

Post a Comment