प्रश्न :-
खरेदीदाराने फसवून किंवा इतर कामासाठी बरोबर नेऊन खरेदीदस्तावर सह्या घेतल्या आहेत अशी तक्रार असल्यास मंडलअधिकारी यांनी काय निर्णय घ्यावा?उत्तर :-
या तक्रारीमध्येही खरेपणा नसतो. नोंदणीकृत दस्त हा दुय्यम निबंधक कार्यालयातच होतो. दुय्यम निबंधक कार्यालयात आपण कोणत्या दस्तावर सही करीत आहे हे सही करणार्या सर्वांना माहीत असते.
शंका असल्यास दुय्यम निबंधक किंवा तेथील कर्मचार्यास विचारणा करता येऊ शकते.
फसवणूक झाली असल्यास संबंधीताने फौजदारी स्वरूपाची तक्रार करणे गरजेचे असते. परंतु तसे न करता तक्रारदार महसूल अधिकार्याकडे मुद्दाम तक्रार करतो.
भारतीय पुरावा कायदा कलम ९१ व ९२ अन्वये नोंदणीकृत दस्ताच्या विरूध्द दिलेला तोंडी पुरावा ग्राह्य धरता येत नाही.
दिवाणी न्यायालयाने दस्त बेकायदेशीर ठरविला नसेल किंवा दिवाणी न्यायालयाकडून दस्त रद्द करुन घेण्यात आला नसेल तर महसूल दफ्तरी अशा नोंदणीकृत दस्ताची नोंद करणे कायदेशीर ठरते.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in