एखाद्या व्यक्तीने नोंदणीकृत खरेदी दस्ताची प्रत तलाठी यांच्‍याकडे हजर केल्‍यास कोणत्या प्रकारची कार्यवाही करावी? तसेच काय खबरदारी घ्‍यावी?

प्रश्‍न :-

एखाद्या व्यक्तीने नोंदणीकृत खरेदी दस्ताची प्रत तलाठी यांच्‍याकडे हजर केल्‍यास कोणत्या प्रकारची कार्यवाही करावी? तसेच काय खबरदारी घ्‍यावी?

उत्तर :-

कोणताही हक्‍क धारण केल्‍याची माहिती कायदेशीरपणे प्राप्‍त झाल्‍यावर तलाठी यांनी त्‍याची नोंद गाव नमुना सहा मध्‍ये नोंदविणे आवश्‍यक आहे.

  • तलाठी यांनी खरेदी घेणार किंवा खरेदी देणार यांनी समक्ष हजर केलेली नोंदणीकृत दस्ताची प्रत साक्षांकीत असावी याची खात्री करावी.
  • कोणताही हक्‍क संपादन झाल्‍यावर तलाठ्‍यांना लेखी अथवा तोंडी कळविले जाते याला 'वर्दी' म्‍हणतात. अशा वर्दीची पोहोच नमुना ७ मध्‍ये द्‍यायची असते.
  • सदर व्‍यवहाराची नोंद गाव नमुना ६ मध्ये (हक्काचे पत्रक किंवा फेरफार रजिस्टर) करावी. [म.ज.म.अ.१९६६, कलम १५० (१)]
  • गाव नमुना सहामध्‍ये नोंद घेतल्‍यावर गाव नमुना सहाची एक प्रत गाव चावडीच्‍या नोटीस बोर्डवर लावणे आवश्‍यक आहे.
  • नोंदणीकृत दस्त/अ पत्रक/इंडेक्स-२ मध्ये तसेच खरेदी देणार याच्या ७/१२ उतार्‍यावर नमूद सर्व हितसंबंधीतांना नमुना ९ मध्ये, १५ दिवसाच्या मुदतीत समक्ष हजर राहण्याची सूचना देणारी नोटीस बजवावी.
  • या नोटीसीची एक प्रत तलाठी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करावी. [म.ज.म.अ.१९६६, कलम १५० (२) अन्वये]
  • नोटीसीनुसार सर्व हितसंबंधीत हजर राहिल्यास त्या सर्वांची संमतीदर्शक स्वाक्षरी नोटीस पुस्तकावर घ्यावी. जमीन शेतीची आणि शेती क्षेत्रात असल्यास, खरेदी घेणार हे शेतकरी असल्याची पुराव्यासह खात्री करावी.
  • फेरफार नोंदीबाबत कोणी लेखी अथवा तोंडी आक्षेप/हरकत घेतल्‍यास त्‍यास द्‍यावयाची पोहोच नमुना १० मध्‍ये द्‍यायची असते. [म.ज.म.अ.१९६६, कलम १५० (३) अन्वये] आणि हरकतीची नोंद विवादग्रस्‍त प्रकरणांची नोंदवहीत (गाव नमुना सहा-अ मध्‍ये) करावी.
  • विवादास्पद नोंदीवर निर्णय घेण्याचे अधिकार अव्वल कारकुनच्या हुद्द्यापेक्षा कमी नाही अशा महसुली किंवा भूमापन अधिकार्‍यांना आहेत. [म.ज.म.अ. १९६६, कलम १५० (६)]
  • संबंधीत नोंदीवर घेतल्‍या गेलेल्‍या हरकतीची माहिती मंडलअधिकारी/प्रमाणन अधिकारी यांना द्‍यावी.
  • संबंधीत नोंदीवर निर्णय घेण्‍यासाठी प्रमाणन अधिकार्‍याच्‍या भेटीची सूचना नमुना ११ मध्‍ये तलाठ्‍यास प्राप्‍त होते.
  • फेरफार नोंदीबाबत निर्णय घेण्‍यासाठी मंडलअधिकारी/प्रमाणन अधिकारी यांच्‍या भेटीची सूचना नमुना ११ मध्‍ये प्राप्‍त झाल्‍यानंतर, तलाठ्‍याने त्‍या नोंदीशी संबंधीत सर्व हितसंबंधीतांना सुनावणीसाठी हजर राहण्‍याची नोटीस नमुना १२ मध्‍ये बजवायची असते.
  • प्रमाणन अधिकार्‍यांनी विवादास्पद प्रकरणे शक्यतो एका वर्षाच्या आत निकालात काढावी. [म.ज.म.अ.१९६६, कलम १५० (४)]
  • गाव नमुना सहा मधील कोणतीही नोंद सक्षम अधिकार्‍याने प्रमाणीत केल्‍याशिवाय त्‍याची नोंद अधिकार अभिलेखात नोंदविता येत नाही.
Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

About the author

Mahsul Guru
Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment