नोटीस बजावणे म्‍हणजे काय?

प्रश्‍न :-

'नोटीस 'बजावणे' म्‍हणजे काय?

उत्तर :-

'नोटीस ’बजावणे’ याचा अर्थ संबंधीत व्यक्तीला नोटीस प्राप्त होणे.

  • पहिली नोटीस शक्यतो पोस्टाने पाठवली जाते किंवा कोतवालामार्फत संबंधीत व्‍यक्‍तीवर समक्ष किंवा त्‍या व्‍यक्‍तीच्‍या विधी सल्‍लागारावर बजावून पोहोच घेता येते अथवा पोहोच-देय नोंदणीकृत पोस्टाने पाठवली जाते. पोहोच-देय नोंदणीकृत पोस्टाची पोहोच परत आल्यास नोटीस बजावली गेली असे गृहित धरले जाते.
  • अंतिम नोटीस ही संबंधीत इसमाच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यावर, त्‍याच्‍या घरातील सज्ञान व्‍यक्‍तीकडे देऊन व त्‍याची पोहोच घेऊन नोटीस बजावता येते अथवा पंचनाम्याने, घराच्या मुख्‍य दरवाज्याला किंवा जमिनीला डकवून (चिकटवून) बजावली जाते. अशाप्रकारे पंचनाम्याने डकवलेली नोटीस बजावली गेली असे गृहीत धरले जाते.
  • काही प्रकरणात वर्तमानपत्रात प्रसिध्‍द करून नोटीस बजावता येते.
  • अपील किंवा फेरतपासणी प्रकरणांत दिलेल्या आदेशान्वये नोंदविलेल्या नोंदीची नोटीस पक्षकारांना देण्याची आवश्यकता नसते. [महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम १९७१ चा नियम ३६]
Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

About the author

Mahsul Guru
Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment