देवस्‍थान इनाम जमिनीवरील कुळ मयत झाल्‍यास त्‍याच्‍या वारसाची नोंद करता येते काय?

प्रश्‍न :-

देवस्‍थान इनाम जमिनीवरील कुळ मयत झाल्‍यास त्‍याच्‍या वारसाची नोंद करता येते काय?

उत्तर :-

होय, देवस्‍थान इनाम जमिनीला वारसांची नोंद होऊ शकते, परंतु येथे जन्‍माने वारस ठरण्‍याऐवजी मयतानंतर प्रत्‍यक्ष पुजाअर्चा करणारा वारस ठरतो. म्‍हणजेच पदामुळे मिळणारा उत्तराधिकार हे तत्‍व येथे लागू होते.

एखाद्‍या मयत पुजार्‍याला चार मुले वारस असतील तर पुजाअर्चा व वहिवाटीसाठी पाळी पध्‍दत ठरवून द्‍यावी असे अनेक न्‍यायालयीन निर्णयात म्‍हटले आहे.

मठाचा प्रमुख/पुजारी, अविवाहीत असला किंवा त्‍याला वारस नसल्‍यास तो त्‍याच्‍या मृत्‍यूच्‍या आधी शिष्‍य निवडून त्‍याला उत्तराधिकार देऊन जातो.

परंतु या जमिनीचे वारसांमध्‍ये वाटप होत नाही तसेच एका कुटुंबाकडून दुसर्‍या कुटुंबाकडे हस्‍तांतरण होत नाही.

Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

Post a Comment